कृष्णेच्या निर्मलतेसाठी झटले हजारो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:08 PM2018-09-26T23:08:08+5:302018-09-26T23:08:12+5:30

Thousands of hands wound up for cleansing of Krishna | कृष्णेच्या निर्मलतेसाठी झटले हजारो हात

कृष्णेच्या निर्मलतेसाठी झटले हजारो हात

Next

कºहाड : कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगम पावलेल्या काठावर जलकुंडात तसेच नदीत नुकतेच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशमूर्तीचे विसर्जन करीत असताना स्वच्छतेचे भान ठेवत नदीप्रदूषण टाळण्याचा यशस्वी प्रयत्न यावेळी कºहाडकरांनी केला असल्याचे पाहायला मिळाले. अकरा दिवसांच्या उत्सवानंतर विसर्जन व त्यानंतरच्या तीन दिवसांत हजारो हात कृष्णानदीच्या व शहर स्वच्छतेसाठी झटले. यावर्षी कृष्णा नदी वाचविण्याचा जणू संकल्पच कºहाडकरांनी केला असल्याचे दिसून येत आहे.
अकरा दिवसांच्या गणेशोत्सव कालावधीत शहरात कोठेही दुर्गंधी तसेच अस्वच्छता न व्हावी, यासाठी प्रत्येक कºहाडकर नागरिकाने चोखपणे जबाबदारी पार पडली. पालिकेतील लोकप्रतिनिधींसह अधिकारी वर्गाने नागरिकांना स्वच्छता राखण्याच्या केलेल्या आवाहनास नागरिकांनी साथ दिली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव पार पाडत तीन हजारांहून अधिक मूर्ती जलकुंडात विसर्जित करून तसेच बावीस टनांहून अधिक निर्माल्य पालिकेस सुपूर्द केल्यामुळे कºहाडकर नागरिकांनीही आपली कृष्णा नदी स्वच्छ राहावी, अशी इच्छा वाटत असल्याचे दाखवून दिले.
कृष्णाबाई घाट सुशोभीकरणास एकूण ५.८० कोटी अनुदान पालिकेस देण्यात आले आहे. त्यातून कृष्णाबाई घाट सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी खूप अवधीही लागणार आहे. मात्र, सुशोभीकरणाची जबाबदारी जशी पालिकेची आहे. तशीच तशी नदीपात्राचे व नदीचे सौंदर्य अबाधित राखण्याची जबाबदारी प्रत्येक कºहाडकर नागरिकाची आहे, अशी इच्छा मनाशी बाळगून गणेशोत्सवात विजर्सन दिवसापासून सलग तीन दिवस सामाजिक संघटनेतील पदाधिकारी, पालिका नगरसेवकांसह अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा केले व नदीपात्र स्वच्छ करून पुन्हा कृष्णा नदी स्वच्छतेचा संदेश दिला.
परेड करणाऱ्या राष्ट्रीय छात्रसेनेतील
विद्यार्थ्यांच्या हातात झाडू अन् पोती
राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांकडून दररोज परेड करण्याचे काम न चुकता केले जाते. मंगळवारी मात्र या परेड करणारे हात कृष्णा नदी वाचविण्यासाठी व स्वच्छतेसाठी पुढे सरसावलेले पाहायला मिळाले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन नदीपात्राची तसेच दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाची स्वच्छता केली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला.

जनजागृतीला यश...
कºहाडच्या कृष्णा नदीत होणारी दुर्गंधी व दूषित पाणी रोखण्यासाठी कºहाड पालिका व सामाजिक संघटनांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. गणेशोत्सवात नदी स्वच्छ राहावी म्हणून ठिकठिकाणी डस्टबीन, ट्रॉली, निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. पालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत नदीत यावर्षी नागरिकांनी निर्माल्य न टाकता सुमारे बावीस टनाहून अधिक निर्माल्य पालिकेस जमा केले. नागरिकांमध्ये नदी स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती करण्यात पालिकेस यश येत असल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: Thousands of hands wound up for cleansing of Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.