कृष्णा हाॅस्पिटलचे कोरोनामुक्तीचे सहस्त्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:42 AM2021-05-25T04:42:41+5:302021-05-25T04:42:41+5:30

कऱ्हाड : पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही ११०० हून अधिक रुग्णांना कोरोनामुक्त करत, ...

Thousands of Krishna Hospital's coronation! | कृष्णा हाॅस्पिटलचे कोरोनामुक्तीचे सहस्त्र!

कृष्णा हाॅस्पिटलचे कोरोनामुक्तीचे सहस्त्र!

Next

कऱ्हाड : पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही ११०० हून अधिक रुग्णांना कोरोनामुक्त करत, कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण केले आहे. आजअखेर एकूण ४३७८ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश प्राप्त झाले असून, कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू असलेल्या उपचारांमुळे १८ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. आजअखेर कृष्णा हॉस्पिटलने ४३७८ रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे.

याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले म्हणाले, गेल्यावर्षी आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना केला आणि यावर्षी दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही गंभीर स्वरूपाची आहे. या दुसऱ्या लाटेत जलद गतीने संक्रमण होताना दिसून आले. किंबहुना तरुणांमध्ये याचे संक्रमण अधिक आढळून आले. त्यातही या लाटेत सुरुवातीच्या काळात रुग्णात फारशी लक्षणे दिसून येत नसल्याने, अनेकांनी गंभीर स्थिती झाल्यावरच दवाखान्यात दाखल होण्याचा मार्ग पत्करलेला दिसतो. कोरोनाच्या या दुसरा लाटेचा सामना करण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलने ४०० बेडचा स्वतंत्र कोरोना वॉर्ड करून, या ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्याही वाढविण्यात आली आहे.

दरम्यान, यावर्षी म्युकरमायकोसिस या नव्या आजारानेही डोके वर काढले असून, या आजाराचा प्रादुर्भाव झालेले ५ रुग्ण कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. या आजाराच्या उपचारासाठी फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ यांची संयुक्त टीम तयार करण्यात आली असून, दाखल रुग्णांपैकी ३ बरे झाले आहेत.

तज्ज्ञांनी पुन्हा तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून, या लाटेचा सामना करण्यास हाॅस्पिटल सज्ज असल्याचेही डॉ. भोसले यांनी सांगितले आहे.

सोबत : हॉस्पिटलचा फोटो

Web Title: Thousands of Krishna Hospital's coronation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.