साताऱ्यात फुटक्या तलावातील हजारो मासे मृत

By सचिन काकडे | Published: July 26, 2023 11:32 AM2023-07-26T11:32:25+5:302023-07-26T11:33:09+5:30

तब्बल दोन ट्रॉली माशांची पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोत विल्हेवाट लावण्यात आली 

Thousands of fishes died in a small lake in Satara | साताऱ्यात फुटक्या तलावातील हजारो मासे मृत

साताऱ्यात फुटक्या तलावातील हजारो मासे मृत

googlenewsNext

सातारा : साताऱ्यातील फुटक्या तलावातील हजारो मासे आज, बुधवारी सकाळी अचानक मृत्युमुखी पडले. पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काही नागरिकांच्या मदतीने तलावातील मासे तातडीने बाहेर काढले. तब्बल दोन ट्रॉली माशांची पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोत विल्हेवाट लावण्यात आली. 

तलावातील मासे मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे नागरिकांमधूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मृत मासे पाहण्यासाठी सकाळी नागरिकांची तळ्याभोवती गर्दी जमली. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Thousands of fishes died in a small lake in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.