नो टोबॅको रनमध्ये धावले हजारो सातारकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 06:13 PM2018-06-10T18:13:50+5:302018-06-10T18:13:50+5:30

तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी व तंबाखूमुक्त सातारा निर्मितीसाठी तसेच लोकांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने रविवार, १० रोजी सकाळी साडेपाच वाजता नो टोबॅको रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो सातारकरांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Thousands of Satarkar runs in the No Tobacco Run | नो टोबॅको रनमध्ये धावले हजारो सातारकर

नो टोबॅको रनमध्ये धावले हजारो सातारकर

Next

सातारा : तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी व तंबाखूमुक्त सातारा निर्मितीसाठी तसेच लोकांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने रविवार, १० रोजी सकाळी साडेपाच वाजता नो टोबॅको रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो सातारकरांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम राबविण्याची ही प्रथमच वेळ आहे. गेल्यावर्षीपासून या नो टोबॅको रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करत आहे. व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने वात्सल्य फाउंडेशन हॅपी, पीपल फाउंडेशन यांच्या सहकार्याने नो टोबॅको रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्ज्वला माने, वात्सल्य फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत पवार, हॅपी पीपल फाउंडेशनचे अजय गायकवाड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक पोळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक मोरे, दंत शल्यचिकित्सक डॉ. योगिता शहा, दंत शल्यचिकित्सक डॉ. विजया जगताप, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Thousands of Satarkar runs in the No Tobacco Run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.