साताऱ्यात सैन्यभरती प्रक्रियेला प्रारंभ, देशसेवेचे स्वप्न साकारण्यासाठी हजारो तरुण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:39 AM2017-12-08T11:39:01+5:302017-12-08T11:49:21+5:30
सैनिकांचा जिल्हा म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. येथील प्रत्येक गावातील प्रत्येक तरुण देशसेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहतो. सैन्यभरतीस शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातून तरुण दाखल झाले आहेत. येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल तसेच पोलिस कवायत मैदानावर भरतीस प्रारंभ झाला. यासाठी पूर्वनियोजित जिल्ह्यांतून सुमारे ६१ हजार तरुण दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सातारा : सैनिकांचा जिल्हा म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. येथील प्रत्येक गावातील प्रत्येक तरुण देशसेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहतो. सैन्यभरतीस शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातून तरुण दाखल झाले आहेत.
येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल तसेच पोलिस कवायत मैदानावर भरतीस प्रारंभ झाला. यासाठी पूर्वनियोजित जिल्ह्यांतून सुमारे ६१ हजार तरुण दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भरतीबाबत तरुणांमध्ये उत्साह दिसून येत असून परजिल्ह्यातील तरुण गुरुवारी सकाळपासूनच दाखल झाले आहेत. शुक्रवार, दि. १८ पर्यंत सलग दहा दिवस भरती चालणार असून या कालावधीत सोल्जर, जीडी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लार्क, सोल्जर ट्रेड्समन आदी पदांसाठी भरती होणार आहे.
साताऱ्यात सैन्य भरती होत आहे. ही प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यासाठी सातारा शहर, शाहूपुरी, पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्तव्य बजावणार आहेत.