उसने पैसे दिले नाहीत म्हणून गोळ्या घालण्याची धमकी, साताऱ्यात तिघांवर गुन्हा नोंद 

By नितीन काळेल | Published: April 21, 2023 04:36 PM2023-04-21T16:36:34+5:302023-04-21T16:36:50+5:30

मारहाण करत गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली

Threatened to shoot for non payment, A case has been registered against three in Satara | उसने पैसे दिले नाहीत म्हणून गोळ्या घालण्याची धमकी, साताऱ्यात तिघांवर गुन्हा नोंद 

उसने पैसे दिले नाहीत म्हणून गोळ्या घालण्याची धमकी, साताऱ्यात तिघांवर गुन्हा नोंद 

googlenewsNext

सातारा : उसने पैसे दिले नसल्याच्या रागातून एका तरुणाला मारहाण करत गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना सातारा शहरात घडली असून, शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सुशांत संदीप ढवळे (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार साईराज निकम, निरंजन ढोणे (पूर्ण नाव नाही, दोघेही रा. ढोणे काॅलनी, सातारा) आणि निखिल जाधव (पूर्ण नाव पत्ता नाही) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि.१९ एप्रिल रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास रविवार पेठेत हा प्रकार घडला. 

उसने पैसे न दिल्याच्या रागातून संशयितांनी तक्रारदाराला शिवीगाळ करून हाताने तसेच दगडाने मारून जखमी केले. तसेच गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत तक्रारदाराच्या डाव्या डोळ्याला तसेच डोक्यात मार लागला आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार खलिफा हे तपास करीत आहेत.

Web Title: Threatened to shoot for non payment, A case has been registered against three in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.