कोल्हापूर नाका-कृष्णा पूल रस्त्यासाठी साडेतीन कोटी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:37 AM2021-04-10T04:37:56+5:302021-04-10T04:37:56+5:30

कराड : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी साडेतीन कोटींचा भरीव ...

Three and a half crore funds sanctioned for Kolhapur Naka-Krishna bridge road | कोल्हापूर नाका-कृष्णा पूल रस्त्यासाठी साडेतीन कोटी निधी मंजूर

कोल्हापूर नाका-कृष्णा पूल रस्त्यासाठी साडेतीन कोटी निधी मंजूर

googlenewsNext

कराड : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी साडेतीन कोटींचा भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे कराड शहरातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची सुधारणा होऊन नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. यासह कृष्णा पुलाचे संथ गतीने सुरू असलेले काम, कृष्णा पुलाशेजारील रखडलेले संरक्षक भिंतीचे काम, सैदापूर ते ओगलेवाडी रस्त्याच्या बाजूला साठणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणारी समस्या, सुर्ली घाटातील रस्त्याच्या कामासह अन्य कामांसाठी खासदार श्रीनिवास पाटील हे प्रयत्नशील असून, त्याबाबतचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कराड ते विटा हा मार्ग कराड शहरातून जात असून कोल्हापूर नाका ते कृष्णा पुलापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना प्रवास करताना गैरसोयीचे ठरत आहे. तर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने या मार्गावरील वाहनांसाठी अडथळा निर्माण होऊन शहरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली होती.

त्यांनी केलेल्‍या मागणीनुसार कराड-विटा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६-ई वरील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल या २ किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी ३.५० कोटी एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यातून सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या निधीतून रस्त्याचा दर्जा सुधारण्याचे काम पूर्णत्वास जाणार आहे.

Web Title: Three and a half crore funds sanctioned for Kolhapur Naka-Krishna bridge road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.