सातारा: पतसंस्थेतील २४ कोटींच्या अपहार प्रकरणात तिघांना अटक; चेअरमन, व्यवस्थापकासह संचालकाचा समावेश

By दत्ता यादव | Published: October 29, 2022 02:51 PM2022-10-29T14:51:55+5:302022-10-29T14:52:27+5:30

तब्बल चार वर्षांनंतर अटक

Three arrested in case of embezzlement of 24 crores from a credit institution in Phaltan | सातारा: पतसंस्थेतील २४ कोटींच्या अपहार प्रकरणात तिघांना अटक; चेअरमन, व्यवस्थापकासह संचालकाचा समावेश

सातारा: पतसंस्थेतील २४ कोटींच्या अपहार प्रकरणात तिघांना अटक; चेअरमन, व्यवस्थापकासह संचालकाचा समावेश

googlenewsNext

दत्ता यादव

सातारा : कोळकी, ता. फलटण येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत २४ कोटी १ लाख ६० हजार ७६१ रुपयांचा अपहार झाला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने या संस्थेच्या चेअरमनसह संचालक आणि व्यवस्थापकाला तब्बल चार वर्षांनंतर अटक केली.

नितीन शांतीलाल कोठारी (वय ६६, रा. तेली गल्ली, बुधवार पेठ फलटण), माधव कृष्णा अदलिंगे (५६, रा. जाधववाडी नाळे मळा, फलटण), जावेद पापाभाई मणेर (५२, रा. धनगरवाडा, बुधवार पेठ, फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोळकी, ता. फलटण येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील चेअरमन, संचालक, व्यवस्थापकांनी पतसंस्थेच्या ठेवीदारांकडून ठेवीच्या रकमांचा अपहार करून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी ३१ जानेवारी २०१९ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास साताऱ्यातील आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. गेल्या चार वर्षांपासून वरील संशयित पोलिसांना गुंगारा देत होते. दरम्यान, २८ ऑक्टोबर रोजी वरील संशयित हे साताऱ्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, सहायक फाैजदार प्रमोद नलावडे, मनोज जाधव, संतोष राऊत, शफिक शेख आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Three arrested in case of embezzlement of 24 crores from a credit institution in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.