फलटण येथे जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:07+5:302021-05-20T04:43:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीचे दोन गुन्हे करून पसार झालेल्या तिघांना ...

Three arrested for robbery in Phaltan | फलटण येथे जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक

फलटण येथे जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीचे दोन गुन्हे करून पसार झालेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) २४ तासात अटक केली.

महेश जयराम जगदाळे (वय २७), ऋतिक ऊर्फ बंटी देवानंद लोंढे (वय १९, दोघे रा. कांबळेश्‍वर, ता. बारामती, जि. पुणे) व संकेत सुनील जाधव (वय २४, रा. तांदूळवाडी रोड, बारामती), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीचे गुन्हे घडले होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गुन्ह्याचा तपास तातडीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले होते. पथकाने घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. त्यानंतर फिर्यादींशी चर्चा केली. त्या माहितीच्या आधारे बारामती तालुक्‍यातील संशयितांना निष्पन्न केले.

दरम्यान, हे संशयित फलटणमधील सोमवार पेठेत येणार असल्याची माहिती साबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सोमवार पेठेत सापळा लावला होता. यावेळी बारामती बाजूकडून दुचाकीवरून येणाऱ्या तिघांना त्यांनी पकडले. चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी २४ तासात हा गुन्हा उघडकीस आणला आहे. त्यांच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. उपनिरीक्षक अमोल कदम तपास करीत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, नवनाथ गायकवाड, सचि राऊळ, सहायक फौजदार उत्तम दबडे, ज्योतीराम बर्गे, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, रवींद्र वाघमारे, प्रवीण कांबळे, वैभव सावंत, विजय सावंत यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: Three arrested for robbery in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.