बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:29 AM2021-06-01T04:29:53+5:302021-06-01T04:29:53+5:30
उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद करण्यात आले आहेत. ...
उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये दारूची चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. उत्पादन शुल्कचे कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार यांच्या आदेशानुसार, तसेच अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एस. पाटील, उपनिरीक्षक आर. एस. खंडागळे व व्ही. व्ही. बनसोडे यांनी सोमवारी दुपारी वाठार येथे कारवाई करून दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून देशी दारूच्या बाटल्यांचे तीन बॉक्ससह तीन दुचाकी असा १ लाख ४८ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
फोटो : ३१केआरडी०६
कॅप्शन : वाठार, ता. कऱ्हाड येथे कारवाई करून उत्पादन शुल्कच्या पथकाने बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली.