वाईतील मारहाणप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:39 AM2021-03-18T04:39:50+5:302021-03-18T04:39:50+5:30

वाई : येथील औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात पूर्ववैमनस्यातून व जुन्या भांडणाचा राग मनात धरून रविवार पेठ येथील अक्षय नंदकुमार ...

Three arrested in Wai beating case | वाईतील मारहाणप्रकरणी तिघांना अटक

वाईतील मारहाणप्रकरणी तिघांना अटक

googlenewsNext

वाई : येथील औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात पूर्ववैमनस्यातून व जुन्या भांडणाचा राग मनात धरून रविवार पेठ येथील अक्षय नंदकुमार निकम (वय २५) याच्यावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी खंडाळा येथून ताब्यात घेतले.

अमन इस्माईल सय्यद शेख, संग्राम प्रकाश शिर्के, ऋतिक ऊर्फ सौरभ प्रल्हाद गाढवे (सर्व रा. बोपर्डी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांची पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

एकावर औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात सोमवारी (दि. १५) रात्री साडेनऊच्या दरम्यान तिघांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत अक्षय नंदकुमार निकम याच्यावर धारदार शस्त्राने वार केले; तर धीरज दगडे हा गंभीर जखमी झाला होता. अक्षय निकम याच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे व पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलिसांनी खंडाळा येथून अमन इस्माईल सय्यद शेख (वय २१, रा. बोपर्डी) संग्राम प्रकाश शिर्के (२७, रा. म्हसवे, ता. जावळी, हल्ली रा. बोपर्डी) ऋतिक ऊर्फ सौरभ प्रल्हाद गाढवे (२१, सर्व रा. बोपर्डी) यांना खंडाळा येथून ताब्यात घेतले. यानंतर केलेल्या चौकशीत संशयितांनी मागील काही वर्षांपासून सुरू असणाऱ्या वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धारदार शास्त्राने वार केल्याचे कबूल केले. या कारवाईत भाऊसाहेब धायगुडे, सुभाष धुळे, प्रशांत शिंदे, सोमनाथ बल्लाळ, अजित जाधव, विजय शिर्के, आदींनी सहभाग घेतला. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Three arrested in Wai beating case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.