दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:46 AM2021-09-24T04:46:33+5:302021-09-24T04:46:33+5:30

सातारा : चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या ...

Three bike theft cases uncovered | दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस

दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस

Next

सातारा : चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

राजेश सुखदेव चाैगुले, संभाजी मोहन जाधव (दोघेही रा. अतीत, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, खिंडवाडी, (ता. सातारा) येथे हे दोघे चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला कारवाईच्या सूचना दिल्या. या टीमने खिंडवाडी येथे बुधवारी या दोघांना पकडण्यासाठी सापळा लावला. मात्र, दोघे पळून जात असतानाच पोलिसांनी दोघांना शिताफीने पकडले. त्यांच्या ताब्यातून चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, एका मोटारसायकलची अद्याप पोलिसांना माहिती मिळाली नाही. या दुचाकीबाबत पोलीस तपास करत आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ सपकाळ आदींनी या कारवाईत भाग घेतला.

फोटो आहे :

Web Title: Three bike theft cases uncovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.