साताऱ्यातील ‘थ्री इडिट्स’नी दिले समस्यांवर पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:12+5:302021-07-11T04:26:12+5:30

या काळात सर्वात जास्त गरज भासली तरी ऑनलाईन खरेदीची. काही कंपन्या नावाजलेल्या आहेत. त्यांच्याबरोबरच खर्चीक सेवा घेणे येथील हॉटेल ...

Three Edits in Satara provided solutions to the problems | साताऱ्यातील ‘थ्री इडिट्स’नी दिले समस्यांवर पर्याय

साताऱ्यातील ‘थ्री इडिट्स’नी दिले समस्यांवर पर्याय

googlenewsNext

या काळात सर्वात जास्त गरज भासली तरी ऑनलाईन खरेदीची. काही कंपन्या नावाजलेल्या आहेत. त्यांच्याबरोबरच खर्चीक सेवा घेणे येथील हॉटेल चालकांना परवडणारे नव्हते. त्यामुळे या मुलांनी हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकानदारांसाठी ‘पीडीएफ स्टोअर’ उपलब्ध करून दिले. याची लिंक व्यावसायिकांनी ग्राहकांना पाठविली तर ग्राहक घरातून त्यांच्या दुकानातील किंवा हॉटेलमधील मेनू कार्ड पाहू शकतात. त्यामध्ये प्रत्येकाचे दर समजतात. आपणाला आवश्यक त्या वस्तूंची किंवा पदार्थांची यादी निवडली तर त्याचे मूल्य येते. त्याप्रमाणे ऑनलाईन पैैसेही पाठविता येईल अशी सुविधा तयार केली आहे.

चौकट

डॉक्टर आपल्या मोबाईलमध्ये

कोरोनानंतर प्रत्येकजण आरोग्याच्या बाबतीत सतर्क झाला आहे. थोडे काही झाले तर तो डॉक्टरांचा सल्ला घेतो. मात्र त्याचवेळी गर्दीच बाहेर पडणेही धोक्याचे ठरते. यावर या तिघांनी मिळून डॉक्टरांसाठी डिजिटल व्हिजिटिंग कार्ड तयार केले आहे. हे कार्ड डॉक्टरांनी ग्राहकांना पाठविले तर त्यावर मोबाईलवरून प्रत्येक पर्यायांना क्लिक करून एक-एक करत सर्व हवी ती माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे समाजमाध्यमांतील सर्वच पर्यायांची लिंक उपलब्ध करून दिली आहे. त्यावर समुपदेशन, भेटीची वेळ, आगाऊ फी ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पुस्तकांबाहेरचं जग

बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन करत असताना कधीतरी ओझरता उल्लेख आलेला होता. त्याचा बदलत्या जगात वापर करून या मुलांनी अनोखे विश्व तयार केले. त्यामुळे इतर मुलांनाही चांगला पर्याय मिळाला आहे.

फोटो मॅडम देणार आहेत.

Web Title: Three Edits in Satara provided solutions to the problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.