पाचगणी टेबल लॅंन्ड पठारावर वीज पडून तीन घोडी जागीच ठार, घोडे व्यावसायिक बालबाल बचावले

By दीपक शिंदे | Published: October 20, 2022 07:10 PM2022-10-20T19:10:26+5:302022-10-20T19:10:49+5:30

ऐन दिवाळी हंगामाच्या तोंडावर घोड्यांचा मृत्यू झाल्याने घोडे व्यावसायिकांवर संक्रात

Three horses were killed on the spot due to lightning strike on Panchgani Table Land Plateau | पाचगणी टेबल लॅंन्ड पठारावर वीज पडून तीन घोडी जागीच ठार, घोडे व्यावसायिक बालबाल बचावले

पाचगणी टेबल लॅंन्ड पठारावर वीज पडून तीन घोडी जागीच ठार, घोडे व्यावसायिक बालबाल बचावले

googlenewsNext

दिलीप पाडळे

पाचगणी : विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे झाडाच्या आडोश्याला थांबलेल्या घोड्यांवर वीज पडून तीन घोडी जागीच ठार झालीत. ही घटना आज, गुरुवारी (दि.२०) पाचगणी टेबल लँन्ड पठारावर दुपारच्या सुमारास घडली. घोडे व्यावसायिक झाडापासून दूर असल्याने बचावले.

पाचगणी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे काही घोडे व्यावसायिकांनी आपली घोडी झाडालगत असणाऱ्या स्टॉल समोर व आडोश्याला बांधून सदर व्यावसायिक दुसऱ्या स्टॉलमध्ये थांबले. यावेळी जोरदारपणे वीज कोसळल्याने तीन घोडी जागीच ठार झाली. ऐन दिवाळी हंगामाच्या तोंडावर घोड्यांचा मृत्यू झाल्याने घोडे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

या घटनेत शंकर गायकवाड, संभाजी दामगुडे, सुनील कांबळे यांचे अंदाजे चार ते साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे. या स्थितीत या घोडेचालकांना शासनाने मदत करावी अशी मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच घोडे व्यावसायिकांचा व्यवसायही अडचणीत आल्याने त्यांना जिल्हा प्रशासनाकडूनही मदत व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Web Title: Three horses were killed on the spot due to lightning strike on Panchgani Table Land Plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.