मायणीतील तीन हॉटेलवर छापा; तीघांवर गुन्हा
By admin | Published: July 9, 2017 06:34 PM2017-07-09T18:34:03+5:302017-07-09T18:34:03+5:30
मायणी पोलिसांनी शनिवारी रात्री येथील तीन हॉटेलवर छापा टाकून चार हजार तीनशे रुपयांचा देशी दारुचा साठा जप्त केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
सातारा(मायणी)दि. 9 - मायणी पोलिसांनी शनिवारी रात्री येथील तीन हॉटेलवर छापा टाकून चार हजार तीनशे रुपयांचा देशी दारुचा साठा जप्त केला. याप्रकरणी तीघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मायणी पोलिस दुरक्षेत्रातून मिळालेली अधिक माहिती अशी की, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी अधिकारी व कर्मचाºयांसमवेत मायणी येथे गस्त घालत होते. यावेळी त्यांना शहरातील काही हॉटेल व परमीटरूममध्ये अवैधरीत्या दारुविक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी हॉटेल नित्यानंद व रॉयलमध्ये छापा टाकला. या दोन्ही ठिकाणी पोलिसांना अनुक्रमे एक हजार सातशे व दीड हजार रुपयांचा मद्य साठा जप्त केला.
यानंतर पोलिसांनी विटा मार्गावर असलेल्या प्रियांका हॉटेलवर छापा टाकून एक हजार पंचवीस रूपयांची देशी, विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी दीपक भगवान साळुंखे, सचिन हिरालाल साळुंखे व दत्तात्रय संभाजी भिसे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मायणी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
कारवाईत सातत्य हवे-
सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांनी कारभार स्वीकारल्यानंतर दुरºयाच दिवशी ही कारवाई केली. या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने ही कारवाईत सातत्य ठेवावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.