किरुंडे व मालतपूरमधील तिघांना वणवा लावल्याप्रकरणी दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 PM2021-03-26T16:33:58+5:302021-03-26T16:35:51+5:30
fire forest Department Satara-वाई वनपरिक्षेत्रातील वाशिवली परिमंडळात किरुंडेमधील राखीव वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी रामचंद्र जुकाराम ढवळे व चंद्रभागा रामचंद्र ढवळे या दाम्पत्याला प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. दंड न भरल्यास सात दिवसांची साधी कैद आकारण्यात आली आहे. दरम्यान, व्याहळी परिमंडळातील मालतपूर वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी संतोष आत्माराम वाडकर यांना पाचशे रुपयांचा दंड आकारला आला. दंड न भरल्यास तीन दिवसांची साधी कैद आकारण्यात आली आहे.
वाई : वाई वनपरिक्षेत्रातील वाशिवली परिमंडळात किरुंडेमधील राखीव वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी रामचंद्र जुकाराम ढवळे व चंद्रभागा रामचंद्र ढवळे या दाम्पत्याला प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. दंड न भरल्यास सात दिवसांची साधी कैद आकारण्यात आली आहे. दरम्यान, व्याहळी परिमंडळातील मालतपूर वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी संतोष आत्माराम वाडकर यांना पाचशे रुपयांचा दंड आकारला आला. दंड न भरल्यास तीन दिवसांची साधी कैद आकारण्यात आली आहे.
वनविभागाने दिलेली माहिती अशी कि, किरुंडेमधील वनक्षेत्रात मंगळवार ७ फेब्रुवारी २०२१ रोजी ढवळे कुटुंबीयांनी जळावू लाकूड तयार करीत असताना शेजारीच असणाऱ्या वनविभागाच्या परीक्षेत्रास आग लागल्याने १० हेक्टर परिसर जाळून खाक झाले.
यात वनविभागाचे पाच हजार रुपयांचे रुपयांचे नुकसान झाले. तर १ एप्रिल २०२० मध्ये व्याहळी परिमंडळात मालतपूर परिक्षेत्रात शेताचा बांध जाळताना शेजारील वनविभागाच्या क्षेत्रात वीस हेक्टर परिसरात वणवा लागून १५ हजार रुपयांचे वनविभागाचे नुकसान झाले. याप्रकरणी संतोष वाडकर यांना १ डिसेंबर २०२० रोजी न्यायलयाने पाचशे रुपये दंड आकारण्यात आला आहे.
या गुन्ह्यांप्रकरणी वनविभाग सत्र न्यायालय सातारा येथे अपील करणार आहे. संबंधीत आरोपींविरुद्ध भारतीय वनअधिनियम, १९२७ चे कलम २६ (१), (ब), (फ) चे उल्लंघण झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक सातारा भारतसिंग हाडा, सहायक वनसंरक्षक सातारा गोसावी, वाईचे वनक्षेत्रपाल महेश झाजुर्णे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल रत्नाकर सीताराम शिंदे, संदीप पवार, प्रदीप जोशी, अजित पाटील, वनरक्षक करुणा जाधव यांनी कारवाईत भाग घेतला.