साताऱ्यातील वसतीगृहातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:49 AM2019-08-29T11:49:30+5:302019-08-29T11:50:42+5:30
सातारा येथील कोडोलीतील सावित्रीबाई फुले वसतीगृहातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.
सातारा : येथील कोडोलीतील सावित्रीबाई फुले वसतीगृहातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.
संबंधित अल्पवयीन मुली सोळा आणि सतरा वर्षाच्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या या वसतीगृहात राहात होत्या. मंगळवारी सायंकाळी संबंधित तीन मुली वसतीगृहात नसल्याचे व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
वसतीगृहातील वरिष्ठांनी संबंधित मुलींचा इतरत्र शोध घेतला. मात्र, मुली कोठेही सापडल्या नाहीत. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन किरण श्रीहरी सुतार (वय २३, रा. मोळ, ता. खटाव) यांनी तक्रार दाखल केली.
शहर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुलींच्या शोधासाठी विविध ठिकाणी दोन पथके पाठविली आहेत. या मुली आपापल्या घरी अथवा नातेवाइकांकडे गेल्या आहेत का, याचीही पोलीस चौकशी करत आहेत.