थकबाकी असलेले तीन मोबाइल टॉवर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:40 AM2021-03-17T04:40:53+5:302021-03-17T04:40:53+5:30

येथील पालिकेने गतवर्षी ८८ टक्के कर वसूल करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. शहरात १८ हजार मिळकतधारक आहेत. त्यापैकी ...

Three mobile tower seals in arrears | थकबाकी असलेले तीन मोबाइल टॉवर सील

थकबाकी असलेले तीन मोबाइल टॉवर सील

googlenewsNext

येथील पालिकेने गतवर्षी ८८ टक्के कर वसूल करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. शहरात १८ हजार मिळकतधारक आहेत. त्यापैकी १४३ मिळकरधारकांची पन्नास हजारांपेक्षा जास्त थकबाकी आहे. यावर्षी चतुर्थ वार्षिक कर आकारणी लागू केली आहे. सुमारे ३ कोटी ५० लाखांवर वसुलीचे उद्दिष्ट आहे. १५ मार्चपर्यंत २ कोटी ९५ लाख ७७ हजार १६१ वसुली झाली आहे. उर्वरित सुमारे ५५ लाखांच्या वसुलीसाठी कठोर उपाययोजना कराव्या लागतील. पालिकेच्या हद्दीतील सुमारे १८ हजार मिळकतदारांपैकी पन्नास हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या काही मिळकतदारासह बहुतांशी मोबाइल टॉवरची वसुली बाकी आहे. त्यानुसार थकीत कराच्या वसुलीसाठी पालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

थकबाकीदारांना नोटीस दिल्या होत्या. प्रथम नोटीस मिळाल्यापासून कर भरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. या नोटीसद्वारे नियमानुसार मिळकतींची सार्वजनिक प्रसिद्धी देणे, जप्ती वॉरंट काढणे, ध्वनिक्षेपकावरून नाव पुकारून सावधान करणे, नळ कनेक्शन बंद करणे, मिळकतींवरील भार दाखवणे, खरेदी-विक्रीपासून मज्जाव करणे, डिफॉल्टर घोषित करणे असे कठोर निर्णय घेतले जाणार, असे सूचित केले होते. दोन वर्षे व त्यापेक्षा जुन्या थकीत कराची वसुली व्हावी म्हणून कर विभाग विशेष प्रयत्नशील आहे. नोटीस देऊनही थकबाकी न भरलेल्यांवर धडक मोहीम राबविली. करभरणा न केलेले शहरातील तीन मोबाइल टॉवर पालिकेच्या पथकाने सील केले आहेत. या पथकात करनिरीक्षक राजेश काळे, सोमाजी गावडे, सदाशिव येडगे, सचिन शिंदे , रामदास शिंदे, बाजीराव येडगे, तेजस शिंदे, मनोहर पालकरसह कर्मचारी सहभागी झाले होते.

- चौकट

सील केलेले टॉवर व थकबाकी

१) इंडस टाॅवर कंपनी अयोध्या हॉटेल वरचा मजला ३ लाख ४५ हजार रुपये.

२) इंडस टॉवर कंपनी डुबलनगर ४ लाख १२ हजार ९८८ रुपये

३) जाधव वस्ती मोबाइल टॉवर २ लाख रुपये

- कोट

नोटिसा देऊनही थकबाकी ठेवणाऱ्या थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्यास सुरुवात केली आहे. या पर्यायानंतरही थकीत कर ठेवणाऱ्या मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव किंवा त्या मालमत्ता पालिकेच्या नावावर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पुढील प्रक्रिया करणे. अशा व यापेक्षाही कठोर कारवाया करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

- राजेश काळे, करविभाग प्रमुख

फोटो : १६केआरडी०६

कॅप्शन : मलकापुरात पालिका कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये थकीत रक्कम असलेले मोबाइल टॉवर सील केले.

Web Title: Three mobile tower seals in arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.