साताऱ्यात जीप कॅनॉलमध्ये कोसळून तीन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 09:49 AM2018-06-11T09:49:04+5:302018-06-11T09:49:04+5:30
चालकाचा ताबा सुटून जीप कॅनॉलमध्ये कोसळल्यानं तीन जणांचा मृत्यू झाले असून 5 जण जखमी झाले आहेत. लोणंद-नीरा रस्त्यावरील पाडेगावाजवळील ही घटना आहे.
लोणंद (सातारा) : चालकाचा ताबा सुटून जीप कॅनॉलमध्ये कोसळल्यानं तीन जणांचा मृत्यू झाले असून 5 जण जखमी झाले आहेत. लोणंद-नीरा रस्त्यावरील पाडेगावाजवळील ही घटना आहे. जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश आहे. सृष्टी संतोष साळुंखे (वय 9 वर्ष), महेश जगन्नाथ बल्लाळ (वय 26 वर्ष) आणि दादा गोरख बल्लाळ (वय 4 वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यातील वावरहिरे गावातून साळुंखे आणि बल्लाळ हे दोन कुटुंबीय रविवारी रात्री उशीरा जीप (क्र. MH 42 AQ 574) मधून मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होते. प्रवासादरम्यान, जीप पाडेगावजवळ आलेली असताना चालकाचा ताबा सुटून ती कॅनॉलमध्ये कोसळली. यावेळी पाण्यात बुडून चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
आपघाताची माहिती मिळताच पाडेगावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जीपमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.