आॅनलाईन कर्जमाफी यादीतून कोरेगाव तालुक्यातील तीन गावे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:58 PM2017-08-12T13:58:15+5:302017-08-12T14:05:51+5:30
वाठार स्टेशन : शासनाच्या कर्जमाफीत रोज नवनवीन गोंधळ ऐकायला मिळत आहे. कर्जमाफीसाठी अर्ज आॅनलाईन भरण्याचे काम सुरूअसताना कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन, अंबवडे संमत वाघोली हे तीन गावेच यादीतून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वाठार स्टेशन : शासनाच्या कर्जमाफीत रोज नवनवीन गोंधळ ऐकायला मिळत आहे. कर्जमाफीसाठी अर्ज आॅनलाईन भरण्याचे काम सुरूअसताना कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन, अंबवडे संमत वाघोली हे तीन गावेच यादीतून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजना अमलात आणली. पण याबाबत असलेल्या चुकीच्या निकषामुळे शेतकरी योजनेबाबत उदासिन आहेत. कर्जमाफीत सरकारने कर्जास कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकºयाच्या वारसालासुध्दा यातुन वगळले आहे. एवढेच नाही तर पती किंवा पत्नी वारलेली असेल तर त्यांनाही यातून वगळले आहे. नियमीत कर्जदार ही कर्जमाफी निकषाबाहेर कसे राहतील अशा पध्दतीचे काम यामाध्यमातून केले आहे.
शेतकरी संघटना, आघाडी सरकार यांच्या दबावामुळे कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला मात्र काही दिवसांतच कर्जमाफीचा खरा चेहरा शेतकºयांसमोर आला. वेगवेगळ्या निकषांच्या कात्रित कर्जबाजारी शेतकºयाला अडकवले गेल्याने कर्जमाफिचा लाभ खरेच मिळणार काय? ही केवळ चेष्टा याचे उत्तर सर्वाना अपेक्षीत आहे.
शेतकºयांनी १ एप्रिल २००९ नंतर पीक व मध्यम मुदत कर्ज घेतले. ते ३० जून २०१६ पर्यत थकित आहे अशा शेतकºयांना दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. थकित कर्जाची रक्कम दीड लाखापेक्षा जास्त असेल तर त्या शेतकºयांनी संपूर्ण कर्जाची रक्कम अगोदर बँकेत जमा केल्यानंतरच त्यांना दीड लाखाचा लाभ मिळणार आहे.
पीक कर्जाची परतफेड २०१५-१६ व २०१६-२०१७ मध्ये करणाºया शेतकºयांना कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजारांचा लाभ मिळणार आहे. वास्तविक सेवा सोसायट्यामार्फत कर्ज घेतलेल्या बहुतांशी शेतकºयांची कर्जे ही नियमित असल्याने त्यांना कर्जमाफिचा दीड लाखाचा लाभ मिळणार नाही. थकित संपुर्ण कर्ज भरण्यासाठी अनेकांकडे पैसे नाहीत कारण बँका त्यांना दुसरे कर्ज देण्यास तयार नाहीत.
कर्जमाफीसाठी सध्या महा-ई- सेवा केंद्रावर गर्दी होत आहे. मात्र या ठिकाणी जाताना ज्या शेतकºयाला पत्नी आहे त्यांचेच अर्ज भरुन घेतले जात आहेत. एकाच कुटुंबात चार खातेदार असतील आणी एकाचे कर्ज थकित असेल तर त्या शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ मिळू शकत नाही.
एकसारख्या नावांच्या गावांना फटका
सध्या आॅनलाईन अर्ज भरताना कोरेगाव तालुक्यात एकाच नावाची असलेल्या गावापैकी एकच गाव दिसत असल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन, अंबवडे (सं) वाघोली ही तीन गावांचा समावेशच नसल्याने या गावातील शेतकºयातून या योजनेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.