फलटणमधील तीन गावे मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:38 AM2021-04-11T04:38:26+5:302021-04-11T04:38:26+5:30
फलटण : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फलटण तालुक्यात गत काही दिवसांत वाढून रुग्ण संख्या पाचशेकडे पोहोचत आहे. निंभोरे दुधेबावी व ...
फलटण : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फलटण तालुक्यात गत काही दिवसांत वाढून रुग्ण संख्या पाचशेकडे पोहोचत आहे. निंभोरे दुधेबावी व ढवळ ही तीन गावे खबरदारीचा उपाय म्हणून मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
फलटण तालुक्यातील मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील हॉस्पिटल व मेडिकल सेवा नियमित सुरू राहणार आहे. मात्र, इतर सर्व आस्थापना बंद राहणार असून सकाळी ६ ते ९ या वेळेत फक्त दूध व भाजीपाला या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. मायक्रो कंटेन्मेंट झोन व बफर झोनकरिता असलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे नागरिकांवर बंधनकारक राहणार असल्याचे आदेशात प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
निंभोरे येथे १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संपूर्ण गावठाण परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मळवीवरचा मळावस्तीपर्यंतचा संपूर्ण परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून तर ढवळ येथे १४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने गार्डेमळा, जाधव वस्ती, शिंदे वस्ती, लोखंडे वस्ती, गावठाण पर्यंतचा संपूर्ण परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.