भेसळप्रकरणी दोघांना तीन वर्ष सक्तमजुरी

By admin | Published: February 2, 2015 10:01 PM2015-02-02T22:01:59+5:302015-02-02T23:49:27+5:30

वाईतील कारखान्याच्या मालकाचा समावेश

Three years of forced labor for three years in adultery | भेसळप्रकरणी दोघांना तीन वर्ष सक्तमजुरी

भेसळप्रकरणी दोघांना तीन वर्ष सक्तमजुरी

Next

सातारा : वाई औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या ‘पॅशन फूड प्रॉडक्ट’चे व्यवस्थापक बाळासाहेब रामराव गव्हाणे आणि मालक रत्नाकर आकोलकर यांना अन्न भेसळप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. नायगावकर यांच्यासमोर याची सुनावणी झाली. अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त (अन्न) रामलिंंग बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाई येथील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या ‘पॅशन फूड प्रॉडक्टस्’मध्ये मिक्सड फ्रुट जामचे उत्पादन व विक्री केली जात होती. तत्कालीन अन्न निरीक्षक दिलीप जोशी यांनी ३ जानेवारी २00३ रोजी साक्षीदार बाळू कृष्णा साळुंखे यांच्यासह कारखान्यास भेट देऊन मिक्स जामचा नमुना तपासणीसाठी घेतला होता.
हा नमुना पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर यामध्ये सल्फर डायआॅक्साईडचे प्रमाण मानकापेक्षा जास्त असल्यामुळे अप्रमाणित घोषित केला. परिणामी पुणे येथील अन्न व औषध सहआयुक्तांनी संबंधित कंपनी व्यवस्थापक आणि मालकाविरोधात खटला दाखल करण्यासाठी संमती दिली होती. त्यानुसार वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात व्यवस्थापक व मालकाविरुद्ध अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ या कायद्याअंतर्गत २00५ मध्ये खटला दाखल करण्यात आला होता.खटल्यामध्ये अन्न निरीक्षक व स्थानिक आरोग्य प्राधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या होत्या. खटल्यामध्ये दाखल करण्यात आलेला पुरावा व सरकारी वकिलांचा युुक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना दोषी ठरविण्यात आले. दरम्यान, हा गुन्हा अन्न भेसळप्रकरणी असून हे समाजविरोधी कृत्य असल्याने व इतरांनी त्यानुसार धडा घ्यावा यासाठी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी विनंती सरकारी वकील डी. आर. नलवडे यांनी केली. आरोपींनी अप्रमाणित व लोकांच्या आरोग्यास घातक अशा प्रकारच्या मिक्स्ड फ्रुट जाम व अन्नपदार्थाचे उत्पादन केले. त्यामुळे त्यांना दया दाखविता येणार नाही, असे प्रथमवर्ग न्यायाधीश पी. पी. नायगावकर यांनी निकालपत्रात नमूद केले. या खटल्यादरम्यान सरकारी वकिलांना अन्नसुरक्षा अधिकारी डी. एस. साळुंखे, वाय. एस. ढाणे, पोलीस हवालदार ए. एस. बांदल व पोलीस नाईक जे. व्ही. वळवी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Three years of forced labor for three years in adultery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.