खुणावतोय ओझर्डेचा रोमांचकारी जलप्रपात

By admin | Published: June 22, 2015 11:06 PM2015-06-22T23:06:20+5:302015-06-22T23:06:20+5:30

पाटण तालुका : पर्यटकांना पावसाळी सहलीची संधी; छोटे धबधबेही कोसळू लागले

The thrilling waterfall of the Ojharde marking | खुणावतोय ओझर्डेचा रोमांचकारी जलप्रपात

खुणावतोय ओझर्डेचा रोमांचकारी जलप्रपात

Next

पाटण : पावसाळ्यातील स्वस्त आणि मस्त पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी एकदिवसीय सहलीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे पर्यटकांचे आकर्षण असलेला आझर्डेचा धबधबा कोसळू लागला आहे. कोयना परिसरात गेले तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे कोयना अभयारण्यातील ओझर्डे धबधबा व त्या मार्गावरील इतर छोटे-मोठे धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांसाठी पावसाळी सहलीची संधी निर्माण झाली आहे.कोयनानगरपासून नवजाकडे जाताना ओझर्डे धबधबा पाहता येतो. अभयारण्यात अत्यंत उंचावरून कोसळणारा जलप्रपात अंगावर रोमांच उभे करत आहे. या धबधब्यातून तीन मोठे प्रवाह कोसळतात त्यामुळे हे दृश्य अधिक विलोभनीय दिसते. ओझर्डे येथील हा धबधबा पाहण्यासाठी जिल्ह्यातील तसेच बाहेरील पर्यटक, युवक मोठी गर्दी करतात. सध्या हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला नसला तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच तो पूर्ण क्षमतेने कोसळू लागेल. (प्रतिनिधी)

वीजनिर्मितीचा मानस...
कोयना अभयारण्यातील या उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा मानस जलसंपदा विभागाचा आहे. वन्यजीव विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या ओझर्डे धबधब्याचा आर्थिक फायदा कोयना येथील काही खासगी व्यक्ती व संस्था घेत असून पर्यटकांपासून नियमबाह्य पैसे उकळ्याचा प्रकार बंद झाला पाहिजे, यासाठी वन्यजीव विभाग व पोलीस यंत्रणेने स्वत:चे अधिकार वापरून धबधब्याजवळ चालणारी लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.
धबधब्यात उतरू नये
ओझर्डे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना सुमारे वीस मिनिटे चालून डोंगर चढावा लागतो. त्याठिकाणी गेल्यानंतर लांबून धबधबा पाहता येतो. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक धबधब्यात उतरून धोका पत्करतात. पर्यटकांनी धोकादायक धाडस करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The thrilling waterfall of the Ojharde marking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.