कºहाडी माणुसकीनं प्रवाशांचा घसा ओलावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:53 PM2018-04-12T23:53:53+5:302018-04-12T23:53:53+5:30

The throat lungs of a crippled person | कºहाडी माणुसकीनं प्रवाशांचा घसा ओलावला

कºहाडी माणुसकीनं प्रवाशांचा घसा ओलावला

Next



संतोष गुरव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : पाण्याचं महत्त्व हे सर्वज्ञात आहे. घरात कोणी पै-पाहुणा किंवा अनोळखी व्यक्ती आल्यास त्याला प्रथम पाण्याने भरलेला तांब्या देण्यासाठी प्रत्येकाचे हात पुढे येतात. कºहाड शहरातही अशीच आपुलकीची सामाजिक बांधिलकी कºहाडकरांकडून जपली जातेय.
घरात येणाऱ्या पाहुण्याप्रमाणे शहरात येणाºया प्रवाशांसाठीही. शहरात येणाºया प्रवाशांना थंडगार पाणी पिता यावं म्हणून ठिकठिकाणी थंडगार पाण्याचे माठ तर कुठे पाणपोया ठेवण्यात आल्या आहेत, हे उत्तम उदाहरण आहे.
सध्या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम केले जात आहे. त्यामुळे सतत पाणीपुरवठा बंद तर वीज पुरवठा खंडित होत आहे. त्याचा नाहक त्रास कºहाडकरांना सहन करावा लागत आहे. आपल्याप्रमाणे शहरात येणाºया प्रवाशांना याचा त्रास होतच असेल असा विचार करीत येथील काही सामाजिक संघटना, रिक्षा संघटना व नागरिकांच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून शहरात थंडगार पाण्याची सोयकरण्यात आली आहे. कुणी थंडगार पाण्याचे मातीचे माठ ठेवत आहे. तर कुणी वॉटर फिल्टर ठेवलेले आहेत. या सामाजिक बांधिलकीस बँका, पतंसंस्था तसेच काही संस्थांनीही हातभार लावला आहे. घोटभर पाण्याअभावी कोरड्या पडलेल्या घशाला आता कºहाडकरांकडून ‘गारवा’ दिला जात आहे. वाढलेल्या उष्मामुळे दुपारी अकरा ते पाच वाजेपर्यंत घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. शहरात येणाºया बाहेरगावच्या प्रवाशांना थंडगार पाण्याची सोय करण्यात आली आहे.
इथं आहेत थंडगार पाणपोई...
१. बसस्थानक परिसर : शिवशक्ती अ‍ॅटो रिक्षा संघटनेची पाणपोई
२. नवग्रह मंदिर परिसर : अजंठा अ‍ॅटो रिक्षा युनियनचे मातीचे माठ
३. कार्वे नाका येथे नंदी चौक : जनावरांसाठीची दगडी कुंड
४. पाटण कॉलनी : शिवाजी गणेश क्रीडा मंडळाची पाणपोई
५. बुधवार पेठ येथे डॉ. आंबेडकर चौक : पाणपोई
६. मंगळवार पेठ येथे पाणपोई
७. पावसकर गल्ली श्रीकृष्ण गजानन मंडळाची पाणपोई
८. विश्रामगृह मार्गावर छत्रपती शाहू चौकात असलेली पाणपोई व माठ
९. पाटणकर कॉलनी मार्ग : थंडगार पाण्याचे फिल्टर
१०. नवीन कृष्णाबाई मंगल कार्यालय : जनावरांसाठी पाण्याचे कुंड
११. गणपती मंदिर, सोमवार पेठे मार्ग : थंडगार पाण्याचे फिल्टर
१२. प्रीतिसंगम बागेत प्रवेशद्वार : थंडगार पाण्याचे फिल्टर
१३. मुळीक चौक : थंडगार माठ
या शासकीय कार्यालयात आहेत पाणपोई
शहरातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात थंडगार पाण्याचे कूलर ठेवण्यात आलेले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालय, पालिका, पंचायत समिती, शिवाजी क्रीडा संकुल येथे थंडगार पाणपोया आहेत.
‘गाढवांसाठींची पाणपोई’ झाली बंद
माणसांप्रमाणे जनावरांना देखील तहान लागत असते. शहरातील पोलीस भवन शेजारी जयसिंगराव करपे धर्मशाळेच्या वतीने ‘गाढवांसाठी पाणपोई’ वर्षानुवर्षे सुरू होती. मात्र, ती काळाच्या ओघात बंद पडली. या ठिकाणी शहरातील गाढवे, पाळीव प्राणी पाणी पिण्यासाठी येत असत.

Web Title: The throat lungs of a crippled person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.