राजेसमर्थकांचा जल्लोष
By admin | Published: May 17, 2014 12:24 AM2014-05-17T00:24:46+5:302014-05-17T00:27:39+5:30
सातारा : राज्यात दुसर्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले विजयी होताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले.
सातारा : राज्यात दुसर्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले विजयी होताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. उदयनराजे सातार्यात येताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोषात मिरवणूक काढली. यंदा कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे मतमोजणी केंद्र होते. मतमोजणी पूर्ण होताच उदयनराजे विक्रमी मतांनी विजयी झाल्याचे स्पष्ट होताच पोवई नाक्यावर ढोलताशे आणि डॉल्बी सिस्टिमसह कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आणि उदयनराजेंची प्रतीक्षा सुरू झाली. दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी उदयनराजे पोवई नाका येथे येताच कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उदयनराजे आणि त्यांच्या पत्नी दमयंतीराजे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील आदी नेते पोवई नाका येथे आले. कार्यकर्त्यांनी या सर्वांना गुलालाने न्हाऊ घातले. त्यानंतर उदयनराजे ‘जलमंदिर’ या आपल्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी आपले दिवंगत वडील प्रतापसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. दरम्यान, पोवई नाक्यावर डॉल्बीसह थांबलेल्या युवकांनी गुलालाची उधळण करीत तेथून कर्मवीर रस्त्याने राजवाड्यापर्यंत फेरी काढली. चौकाचौकात फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)