ढगांचा गडगडाट; विजांचा झगमगाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:06 AM2017-09-14T00:06:39+5:302017-09-14T00:06:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गेल्या दहा दिवसांपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या झगमगाटात जिल्ह्यात पाऊस सुरू असून, अनेक गावांच्या तलाव आणि बंधाºयात पाणीसाठा वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र, अधूनमधून व अनेक ठिकाणी सतत पडणाºया पावसामुळे पिकांचे नुकसानही होऊ लागले आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरणही दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून दररोज काही ठिकाणी एक दिवसाआड पाऊस सुरू आहे. तसेच दुष्काळी भागातही या पावसाने हजेरी लावली आहे. असे असलेतरी अद्यापही गावोगावच्या तलावात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. काही गावचे बंधारेही कोरडे ठाक आहेत.
काही ठिकाणी तलावात, बंधाºयात पाणीसाठा झाला असलातरी यापुढे पाऊस न
झाल्यास तोही लवकर संपून
जाणार आहे. त्याचबरोबर सतत पडणाºया पावसामुळे पिकांचेही नुकसान होऊ लागले आहे. चिखलातून भाजीपाला बाहेर काढावा लागत आहे.
\