थंडीच्या लाटेतही गर्दीचा महापूर!

By admin | Published: December 23, 2014 10:29 PM2014-12-23T22:29:31+5:302014-12-23T23:42:40+5:30

वाई फेस्टिव्हल : अनोख्या अदाकारिने रसिक चिंब---लोकमत माध्यम प्रायोजक

Thunderstorm floods too crowded! | थंडीच्या लाटेतही गर्दीचा महापूर!

थंडीच्या लाटेतही गर्दीचा महापूर!

Next

वाई : ‘वाई फेस्टिव्हल’ मध्ये गु्रप डान्स स्पर्धांचे आयोजन केले होते़ वाई शहराचा मानबिंदू असलेल्या वाई फेस्टिव्हलला सातारा, पुणे, कोल्हापूरमधून स्पर्धक संघ आले होते़ ‘थंडीच्या लाटेतही गर्दीचा महापूर,’ असे अनोखे दृष्य वाईकरांनी अनुभवले. एकाहून एक जबरदस्त नृत्याविष्कार पाहण्यासाठी वाईकरांनी प्रचंड गर्दीने महागणपती घाटाचा नजारा अवर्णनीय झाला होता.
वाईच्या श्री डान्स अकॅडमीने मुरळी डान्सने रसिकांची मने जिंकली व प्रथम क्रमांक प्राप्त केला सातारच्या अजिंक्यतारा कला निकेतन, प्रेम डान्स गु्रप व अनंत इंग्लिश स्कूलच्या संघांनी जबरदस्त आविष्कार सादर केले़ एऩ डी़ एस. गु्रप , डी व्हायरस गु्रप या कलाकारांनी तर तरूणांना अक्षरश: वेड लावलं, कलाकारांचा जोश, उत्साह पाहून प्रेक्षकांची थंडी सुध्दा पळाली़ या स्पर्धेतील स्पर्धकांचे एकाचढ एक परफोरमन्स असल्याने परिक्षक म्हणून काम पाहताना निस्सार शेख व प्रमोद शिंदे यांना स्पर्धेचा निकाल देताना मोठया आव्हानाला सामोरे जावे लागले, शीतल देशपांडे-इनामदार यांनी सूत्रसंचालन केले़
या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक एस़ आऱ ग्रुप वाई व विघ्नहर्ता ग्रुप वाई यांनी मिळाले, तृतीय क्रमांक अनंत इंग्लिश स्कूल, सातारा, द्वितीय क्रमांक डी व्हायरस गु्रपने तर प्रथम क्रमांक आपल्या अभिनयाने सर्वांना अवाक करणा-या श्री डान्स अकॅडमी, वाई यांनी पटकावला़ विजयी संघाना फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुनील शिंदे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा सोनाली शिंदे, सुरेखा यादव, डॉ. जयश्री जगताप, मदनकुमार साळवेकर यांच्या हस्ते मानाचे सन्मानप्रत्र व ट्राफी दिल्या़
वाई फेस्टिव्हलचे निमंत्रक आनंद कोल्हापुरे यांनी स्पर्धेचे निकाल वाचन केले़ यावेळी अनेक वाईकरांनी स्पर्धकांना उस्फूर्तपणे बक्षिसे देऊन स्पर्धकांना प्रोत्साहित केले. कोल्हापूरच्या रूद्राक्ष अ‍ॅकडमीने सादर केलेल्या तांडव नृत्यास वाईकरांनी प्रचंड दाद दिली़
रूद्राक्ष अ‍ॅकडमीचे गणेश बिडकर व कलाकांचा आनंद कोल्हापूरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राजेंद्र धुमाळ, आनंदराव लोळे, नगरसेविका अनुराधा कोल्हापूरे, नलिनी शिंदे, संजीवनी कद्दू, नीला कुलकर्णी, अरूण खरे, सचिन येवले, अलका मुरूमकर व मोठया संख्येने वाईकर नागरिक व ग्रामीण भागातून आलेले नागरिक उपस्थित
होते़ (प्रतिनिधी)


कलाविष्काराने
वाईकर मंत्रमुग्ध
थंडीची लाट, कलाकारांचा अविष्कार, वाईकर रसिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद याने गणपती घाट फूलून गेला़ वाई शहरातील तसेच परिसरातील नागरिकांची उपस्थिती
लक्षणीय होती.

Web Title: Thunderstorm floods too crowded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.