महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील सुशोभिकरणाबाबत गुरुवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:06 AM2021-02-05T09:06:04+5:302021-02-05T09:06:04+5:30

महाबळेश्वर : वारसास्थळ जतन समितीची तेरावी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार, दि. ४ रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी शेखर ...

Thursday meeting on beautification of Mahabaleshwar market | महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील सुशोभिकरणाबाबत गुरुवारी बैठक

महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील सुशोभिकरणाबाबत गुरुवारी बैठक

Next

महाबळेश्वर : वारसास्थळ जतन समितीची तेरावी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार, दि. ४ रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत होत आहे. या बैठकीत महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील सुशोभिकरणाचे भवितव्य ठरणार असल्याने या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा, महाबळेश्वर, पाचगणी व वाई नगर परिषद तसेच महाबळेश्वर व पाचगणी प्रादेशिक योजना क्षेत्रातील वारसास्थळांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासनाने वारसास्थळ जतन समिती स्थापन केली आहे. या वारसास्थळ जतन समितीची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी होत आहे. या बैठकीत महाबळेश्वर, पाचगणी, वाई व सातारा येथील वारसास्थळांना धक्का न लागता या शहरांचा विकास करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

महाबळेश्वर येथील प्रमुख बाजारपेठेचे सुशोभिकरण करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. या सुशोभिकरणाच्या आराखडयात छत्रपती शिवाजी महाराज चौक व सुभाष चौकाचे सुशोभिकरण, बाजारपेठेतील रस्त्याचे रूंदीकरण करणे, डाॅ. साबणे रस्त्यावरील मिळकतींच्या समोरील दोन ते चार फूट दर्शनी भाग घेऊन त्याठिकाणी पदपथ तयार करणे अथवा त्याठिकाणी वृक्ष लागवड करणे, पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था करणे व त्या अनुषंगाने इतर सुशोभिकरणाची कामे करणे याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतरच सुशोभिकरणाच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Web Title: Thursday meeting on beautification of Mahabaleshwar market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.