स्वबळाच्या घोषणेनं ‘वाघांची डरकाळी’ स्वतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:41 AM2018-01-29T00:41:50+5:302018-01-29T00:42:30+5:30

The 'tiger spirits' are independent of the declaration of 'Swing' | स्वबळाच्या घोषणेनं ‘वाघांची डरकाळी’ स्वतंत्र

स्वबळाच्या घोषणेनं ‘वाघांची डरकाळी’ स्वतंत्र

Next

जयदीप जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रहिमतपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली असल्याने सातारा जिल्ह्यातील अनेक इच्छुक दंड थोपटून कामाला लागणार आहेत. विविध विधानसभा मतदार संघांतून पक्षातील अनेकजण इच्छुक
असून, त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही
काळातच शिवसेनेची डरकाळी घुमणार असून, जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलल्याचे दिसून येणार
आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक मावळ्यांना, मातब्बरांना ताकद देऊन शिवसेनेत मानाचे स्थान दिले. त्यामुळे शिवसेना तळागाळात मूळ धरू लागली. मात्र, महाराष्ट्रात एकहाती सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न अधुरे राहिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शिवसेनच्या पदाधिकाºयांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यासाठी ते जोरदार तयारी करू लागले आहेत. तसेच अनेक मातब्बर शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवू शकतात, अशीही स्थिती
आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उद्योगपती असलेले संभाजी सपकाळ हे साताºयातून लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, युतीमध्ये ‘रिपाइं’ला सातारा लोकसभा मतदार संघाची जागा गेली. ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना उमेदवारी मिळाली. परिणामी सपकाळ यांना माघार घ्यावी लागली. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीसाठी साताºयातून संभाजी सपकाळ हे शिवसेनेचे उमेदवार असू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. तसेच शिवेसनेचे माजी जिल्हाप्रमुख व भाजपमध्ये गेलेले पुरुषोत्तम जाधव यांनी घरवापसी केली तर तेही दावेदार ठरु शकतात.
गेल्या विधानसभा निवडणुकीत सातारा-जावळी मतदार संघातून माजी आमदार दगडूदादा सपकाळ लढले होते. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच फलटणमधून डॉ. नंदकुमार तासगावकर, वाईतून
डी. एम. बावळेकर, कोरेगावमधून हणमंत चवरे, माणमधून रणजितसिंह देशमुख, कºहाड उत्तरमधून नरेंद्र पाटील, कºहाड दक्षिण मतदारसंघातून अजिंक्य पाटील यांना
पराभवाचा सामना करावा लागला होता. फक्त पाटण मतदार संघातून आमदार शंभूराज देसाई विजयी
झाले होते. त्यांच्या रुपानेच
जिल्ह्यात शिवसेनेचा एकमेव आमदार आहे.
२०१९ मध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीसाठी साताºयातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, सखाराम पार्टे यांच्यापैकी एक उमेदवार असू शकतो. वाई मतदार संघातून डी. एम. बावळेकर, संभाजी सपकाळ. फलटणमध्ये इतर पक्षात नाराज असलेले तसेच शिवसेनेत येण्यास इच्छुक नावाजलेला उमेदवार असू शकतो.
माणमधून रणजितसिंह देशमुख, रंगकामगार सेनेचे धनाजी सावंत. कोरेगावमधून पुरुषोत्तम माने, हणमंत चवरे, रणजितसिंह भोसले. कºहाड दक्षिणमधून जिल्हाप्रमुख भानुप्रताप उर्फ हर्षल कदम, कºहाड उत्तरमधून तालुकाप्रमुख किरण भोसले यांना उमेदवारी मिळू शकते.
आदेश आला तर बानुगडे-पाटील लढणार...
लोकसभा, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांना पुन्हा पूर्वीच्या संपर्कप्रमुख पदावर कायम ठेवले आहे. मुलुखमैदान तोफ असणाºया बानुगडे-पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा विश्वास आहे. त्यामुळे ‘मातोश्री’वरून आदेश आला तर बानुगडे-पाटील हे सातारा लोकसभा किंवा कºहाड उत्तर विधानसभा मतदार संघातून लढू शकतात.
कोल्हापुरात सहा तर साताºयात एकच आमदार...
कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ असून, सहा ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. सांगली जिल्ह्यात आठ मतदारसंघ असून, एका ठिकाणी तसेच साताºयातही आठपैकी एका ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहे.

Web Title: The 'tiger spirits' are independent of the declaration of 'Swing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.