वडूज शहरात कडेकोट बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:39 AM2021-05-26T04:39:40+5:302021-05-26T04:39:40+5:30
वडूज : खटाव तालुक्यात मंगळवारी संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यात आले. तालुक्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले. शहरासह ग्रामीण ...
वडूज : खटाव तालुक्यात मंगळवारी संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यात आले. तालुक्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले. शहरासह ग्रामीण भागातूनही संचारबंदीला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगाही उगारण्यात आला.
वडूज, खटाव, पुसेगाव, मायणी, पुसेसावळीसह तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णालय व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. वडूज शहरात पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून तपासणीसाठी कर्मचारी तैनात केले होते. वडूज, मायणी औंधमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील शासकीय कार्यालयातदेखील ठरावीक कर्मचारी उपस्थित होते.
परगावाहून दवाखाना व औषधांसाठी शहरात येणार्यांची संख्या तुरळक असली तरी पोलीस प्रशासनाकडून अशा नागरिकांची कसून चौकशी करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील इतर गावांमधून शहराकडे विनाकारण येणार्यांची संख्या रोडावली आहे.