सरकारच्या फसवणुकीमुळे दिवाळीत झुणका-भाकर खाण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 05:32 PM2020-11-14T17:32:08+5:302020-11-14T17:34:55+5:30

Uddhav Thackeray, chandrakant patil, Satara area 'राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर फसवणूक केलेली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करून देखील ती न दिल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर झुणका- भाकर खाण्याची वेळ आली आहे,' अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

Time to eat zhunka-bhakri on Diwali due to government fraud | सरकारच्या फसवणुकीमुळे दिवाळीत झुणका-भाकर खाण्याची वेळ

सरकारच्या फसवणुकीमुळे दिवाळीत झुणका-भाकर खाण्याची वेळ

Next
ठळक मुद्देसरकारच्या फसवणुकीमुळे दिवाळीत झुणका-भाकर खाण्याची वेळमेघा कुलकर्णी यांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी करणार : चंद्रकांत पाटील

सातारा : 'राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर फसवणूक केलेली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करून देखील ती न दिल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर झुणका- भाकर खाण्याची वेळ आली आहे,' अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

आमदार पाटील म्हणाले, 'राज्य सरकार दडपशाहीचा कारभार करत असून सत्य लपवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी देण्याचा घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती, त्यानंतर त्यांनी पुन्हा दहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले. ही मदत दिवाळीपूर्वी देऊ, असे त्यांनी सांगितले होते. मात्र दिवाळी आली तरी शेतकऱ्यांना एक पै मिळालेले नाही. पैसे नसल्याने आता शेतकऱ्यांना लाडू व इतर गोडधोड करता येत नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी किसान आघाडीतर्फे संपूर्ण राज्यात झुणका भाकर खाण्याचे आंदोलन करून राज्य शासनाचा निषेध करण्यात येत आहे.'

माजी आमदार मेघा कुलकर्णी यांना पदवीधरची उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र, ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले, याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले 'पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी प्रत्येकी एक जागा असते. चार जिल्ह्यातून चाळीस इच्छुक असतात त्यामुळे कोणावर तरी अन्याय होणार, हे गृहीत असते. मात्र विधानपरिषदेच्या जागा नेहमीच टप्प्याटप्प्याने रिक्त होत असतात. त्यामुळे माजी आमदार मेघा कुलकर्णी यांचे योग्य ठिकाणी लवकरच पुनर्वसन केले जाईल. त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही.'

भाजप सरकारच्या कालावधीत पदवीधर बेरोजगारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने कर्ज वाटप, औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच कायम विनाअनुदानित शाळांच्या समोरील कायम हा शब्द काढून टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आमच्या शासनाच्या काळात संख्येने मराठा मोर्चे निघाले. संवादाने प्रश्न सुटतात हे आमचे धोरण होते मात्र आताचे सरकार असं वादच करायला तयार नाही अशी स्थिती आहे. तसेच भाजपने दिलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडीला टिकवता आले नाही,' अशी टीका देखील आमदार पाटील यांनी केली.

पदवीधर निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी सातारा येथे मेळावा घेतला. या मेळाव्याला खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश सदस्य सुवर्णाताई पाटील, ज्येष्ठ नेते दत्ताजी थोरात, प्रदेश सदस्य अमित कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष एडवोकेट भरत पाटील आदींची उपस्थिती होती. शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी या मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.

खडसेंचे नाव काढताच म्हणाले रात गई बात गई

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाराज होऊन पक्ष सोडला, याबाबत विचारले असता आमदार चंद्रकांत पाटील यांनी रात गई बात गई असे म्हणत, त्यांचा प्रश्न आता संपला आहे, असे उत्तर दिले.
 

Web Title: Time to eat zhunka-bhakri on Diwali due to government fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.