कर्जबाजरीपणाला कंटाळून उद्योजकानं दिला रेल्वेखाली जिव

By admin | Published: April 7, 2017 12:55 PM2017-04-07T12:55:54+5:302017-04-07T12:55:54+5:30

वाखाण परिसरात राहणा-या उद्योजकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

Tired of loan defaulters, entrepreneurs live under train | कर्जबाजरीपणाला कंटाळून उद्योजकानं दिला रेल्वेखाली जिव

कर्जबाजरीपणाला कंटाळून उद्योजकानं दिला रेल्वेखाली जिव

Next
>ऑनलाइन लोकमत 
क-हाड (सातारा), दि. 7 -   वाखाण परिसरात राहणा-या उद्योजकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. 
 
श्रीकांत दत्तात्रय कुलकर्णी (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभू येथे रेल्वे रुळावर शुक्रवारी सकाळी एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी परिसरात तपास केला असता काही अंतरावर एक कार बेवारस उभी असल्याचे निदर्शनास आले.
 
संबंधित कारची पोलिसांनी माहिती घेतली. यावेळी ती कार वाखाणातील श्रीकांत कुलकर्णी या उद्योजकाची असल्याचे स्पष्ट झाले. तसेच तो मृतदेह कुलकर्णी यांचाच असल्याचे कुटुंबीयांनी ओळखले.
 
शहरातील वाखाण परिसरात मैत्री पार्क इमारतीत श्रीकांत कुलकर्णी वास्तव्यास होते. त्यांची मलकापूर येथे मधुकर इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. कर्जाबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. 

Web Title: Tired of loan defaulters, entrepreneurs live under train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.