Satara: उंदीर मारण्यासाठी औषध घातलं, त्याच हाताने तंबाखू मळली; विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू

By दीपक शिंदे | Published: July 18, 2023 03:43 PM2023-07-18T15:43:21+5:302023-07-18T15:43:45+5:30

अजित जाधव  महाबळेश्वर : उंदीर मारण्याकरिता विषारी औषध घातले व त्याच हाताने तंबाखू मळून खाल्ली. यामुळे विषबाधा होऊन तरुणाचा ...

Tobacco was mixed with the same hand that killed the poison; Death of a young man due to poisoning in satara | Satara: उंदीर मारण्यासाठी औषध घातलं, त्याच हाताने तंबाखू मळली; विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू

Satara: उंदीर मारण्यासाठी औषध घातलं, त्याच हाताने तंबाखू मळली; विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू

googlenewsNext

अजित जाधव 

महाबळेश्वर : उंदीर मारण्याकरिता विषारी औषध घातले व त्याच हाताने तंबाखू मळून खाल्ली. यामुळे विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू झाला. उमेश धोंडिबा ढेबे (वय २६, रा. शिंदी, महाबळेश्वर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सोमवार, दि. ३ रोजी हॅास्पिटलमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणाची सोमवार, दि. १७ रोजी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, उमेश धोंडीबा ढेबे यांनी उंदीर मारण्यासाठी दिनांक शनिवार, दि. १ रोजी दुपारी औषध टाकले होते. त्याच हाताने तंबाखू खाल्ल्याने पहाटे तीन वाजता पोटात दुखू लागले. त्यामुळे त्यांना प्रथम उपचारासाठी कंळबणी या ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. तेथून अधिक उपचाराकरिता रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच ठिकाणी मंगळवार, दि. ४ रोजी उपचारादरम्यान उमेश ढेबे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

या मृत्यूची अधिक चौकशीसाठी रत्नागिरी पोलिस ठाण्यातून दि. ०४ रोजी अन्वये दाखल होऊन टपालाने सोमवार, दि. १७ रोजी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. ही घटना महाबळेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गणेश धोंडीबा ढेबे (रा. शिंदी) यांनी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस तपास करत आहेत.

Web Title: Tobacco was mixed with the same hand that killed the poison; Death of a young man due to poisoning in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.