आजच्या ‘मातृप्रेम डे’ला सरकारी ब्रेक !

By admin | Published: February 13, 2015 09:38 PM2015-02-13T21:38:18+5:302015-02-13T22:59:35+5:30

पहिल्याच घासात खडा : अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला स्थगिती

Today's 'Motherhood Day' government break! | आजच्या ‘मातृप्रेम डे’ला सरकारी ब्रेक !

आजच्या ‘मातृप्रेम डे’ला सरकारी ब्रेक !

Next

फलटण : पाश्चात्य देशात साजरा करण्यात येणारा व खास प्रेमी-प्रेमिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा ‘व्हॅलेंटाईन डे’ हा दिवस दिवसेंदिवस भारतात सजण्याबरोबरच वादग्रस्त होत चालला असतानाच हा दिवस आईवरील प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणून साजरा करावा, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पुढाकार घेतला खरा; पण हा दिवस उगवायच्या आतच ‘तांत्रिक कारणा’ने हे मातृप्रेम आटून गेले. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा खरेतर एकमेकांवर प्रेम व्यक्त करणारा खास दिवस पाश्चात देशात बऱ्याच वर्षांपासून हा दिवस साजरा केला जातो. टी. व्ही, मोबाईलच्या आधुनिक युगात हा दिवस भारतातही मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागला. यामध्ये खास करून युवक-युवतीमधील प्रेमप्रकरणातून या दिवसाला महत्त्व वाढू लागले. भारतात प्रेमी-प्रेमिकांनी एकमेकांवर खास प्रेम व्यक्त करणारा दिवस अशी याची व्याख्या झाली.या माध्यमातून खरे प्रेम व्यक्त होण्याऐवजी यामध्ये अश्लीलता व बिभत्सपणा येऊ लागला. हॉटेल, लॉज, बागबगीचे यानिमित्ताने युवक-युवतींच्या रूपाने गर्दी होऊ लागले. खऱ्या प्रेमाची व्याख्याच यानिमित्ताने बदलली असताना ‘व्हॅलेंटाईन डे’ला काही संघटनातून विरोध होऊ लागला. एकत्र दिसणाऱ्या प्रेमियुगुलांना धोपटून काढायचे प्रकार सुरू झाले. तसेच जातीपातीचेही राजकारण सुरू झाले. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने पोलिसांची डोकेदुखीही वाढू लागली. यावर रामबाण उपाय काढण्याचे आव्हान सातारा जिल्हा परिषदेच्या विभागाने पेलले होता.
दि. १४ फेबु्रवारी रोजी शाळा, कॉलेजला दांडी मारणाऱ्या मुला-मुलींना आपल्या पालनपोषण करणाऱ्या कर्त्यांची जाणीव व्हावी, समाजविघातक प्रकार घडू नये, यासाठी सर्व शाळा, कॉलेजमध्ये दि. १४ फेबु्रवारी हा ‘व्हॅलेंटाईन डे’ आईचे प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश सर्व शाळा, कॉलेजना काढले गेलेले होते.या चांगल्या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत झाले होते. सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने धाडशी निर्णय घेताना प्रेमियुगुलांच्या डोळ्यात अंजन घालण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, हा आदेश तांत्रिक बाबींमुळे रद्द समजण्यात यावा, याचे पत्र सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. या पत्रामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)


व्हेलेंटाईन डे च्या दिवशी आईचे प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणून साजरा करण्याविषयी यापूर्वी आवाहन करण्यात आले होते. मात्र, आता हा आदेश तांत्रिक बाबींमुळे रद्द समजण्यात यावा. याबाबतचे पत्र सातारा जिल्ह््यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले गेले आहे.
- प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी
(प्राथमिक)

उदात्त हेतू निर्णयाआधीच गुंडाळला
व्हेलेंटाईन दिवशी आईचे प्रेम व्यक्त करणारा दिवस मातृप्रेमाचा दिवस या उदात्त विचाराने साजरा करण्याचा क्रांतिकारी निर्णय ठरला असता; परंतु या चांगल्या गोष्टीलाही वेगळे वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने वरच्या पातळीवरुनच निर्णय रद्द करण्याचे आदेश झाल्याची चर्चा आहे.

Web Title: Today's 'Motherhood Day' government break!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.