मसूर परिसरात टोकणीची कामे वेगात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:18+5:302021-06-24T04:26:18+5:30

मसूर : मसूर परिसरात गत दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे टोकणीच्या कामाला वेग आला असून, टोकणी अंतिम टप्प्यात आल्याचे ...

Tokni work in Masur area is in full swing | मसूर परिसरात टोकणीची कामे वेगात सुरू

मसूर परिसरात टोकणीची कामे वेगात सुरू

Next

मसूर : मसूर परिसरात गत दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे टोकणीच्या कामाला वेग आला असून, टोकणी अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असून, पेरणी झालेल्या शेतामध्ये पिकांची उगवण चांगल्या पद्धतीने झाली आहे तर सरी सोडलेल्या शेतामध्ये टोकणीचे काम करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली असल्याचे चित्र दिसत आहे.

या भागात सोयाबीन, भुईमूग, मका, घेवडा आदी पिके टोकणीच्या साह्याने घेतली जातात. सरी सोडलेल्या शेतामध्ये आडसाली उसाची लागण केलेली असल्यामुळे या पिकांकडे दुहेरी नगदी पीक म्हणून पाहिले जाते. बहुतांश शेतकऱ्यांनी ऊसलागवड, खरिपाची पेरणी केल्याचे दिसून येत असले तरी उर्वरित शेतामध्ये टोकणी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

२३मसूर

बेलवाडी (ता. कऱ्हाड) येथे शेतामध्ये महिला शेतकरी टोकणी करत आहेत.

Web Title: Tokni work in Masur area is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.