लोणंद नगरपंचायतीत घड्याळाचीच टिकटिक !

By admin | Published: May 4, 2016 11:22 PM2016-05-04T23:22:45+5:302016-05-05T00:06:47+5:30

कमळही फुलले : अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके-पाटील, तर उपाध्यक्षपदी भाजपचे लक्ष्मणराव शेळके

Tond of Lonand Nagar Panchayat! | लोणंद नगरपंचायतीत घड्याळाचीच टिकटिक !

लोणंद नगरपंचायतीत घड्याळाचीच टिकटिक !

Next

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी आमदार मकरंद पाटील यांनी सर्वांना एकत्र करून आपल्या जादूची झलक दाखविली. राष्ट्रवादी आणि भाजपच्या गठबंधनाला अपक्षाचीही साथ मिळाली. त्यामुळे अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके-पाटील, तर उपाध्यक्षपदी भाजपचे लक्ष्मणराव शेळके यांची बहुमताने निवड करण्यात आली.
लोणंदच्या नगराध्यक्ष निवडीसाठी बुधवारी विशेष बैठक बोलावली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून या निवडीवरून मोठी रस्सीखेच सुरू होती. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके-पाटील, बंडखोर दीपाली क्षीरसागर तर काँग्रेसकडून स्वाती भंडलकर यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मात्र, राष्ट्रवादीतील नाराज गटाला आपलेसे करण्यात आमदार मकरंद पाटील यांना यश आले. त्यामुळे मतदानावेळी दीपाली क्षीरसागर यांनी स्वत:चे मत स्नेहलता शेळके-पाटील यांच्याच पदरात टाकले. ाष्ट्रवादीत आलबेल झाल्यामुळे ठरल्याप्रमाणे उप-नगराध्यक्षपदी भाजपची वर्णी लागली. आमदार मकरंद पाटील सकाळी अकरा वाजता सर्व नऊ नगरसेवकांना घेऊन कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे, सभापती नितीन भरगुडे-पाटील, अ‍ॅड. शामराव गाढवे, मनोज पवार होते. तर भाजपचे दोन्ही नगरसेवक, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विनोद क्षीरसागर यांच्यासोबत एकाच वेळी आले. त्यानंतर काँग्रेसचे सहा नगरसेवक दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी अस्मिता मोरे यांनी काम पाहिले.

राष्ट्रवादीला ११, कॉँग्रेसला ६
सर्वप्रथम दीपाली क्षीरसागर यांच्यासाठी हात उंचावून मतदान घेतले; मात्र त्यांना एकही मत मिळाले नाही. त्यानंतर स्नेहलता शेळके-पाटील यांना राष्ट्रवादीचे आठ, अपक्ष एक आणि भाजपचे दोन अशी अकरा मते मिळाली. तर काँग्रेसचे स्वाती भंडलकर यांना सहाजणांनी मते दिली. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून लक्ष्मणराव शेळके, काँग्रेसकडून राजेंद्र डोईफोडे यांनी अर्ज दाखल केले. त्यातही अकरा विरुद्धसहा मतांनी शेळके विजयी झाले.
आमदार ठाण मांडून !
निवडीनंतर राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करत जल्लोष केला. शहरातून मिरवणूक काढली. निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत आमदार मकरंद पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर नगरपंचायत कार्यालयात ठाण मांडून होते.

Web Title: Tond of Lonand Nagar Panchayat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.