भाताच्या शिवारात रामा हो रामाचे स्वर, पारंपरिक गीतांची चलती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 04:15 PM2019-07-25T16:15:31+5:302019-07-25T16:16:34+5:30
अल्पशा विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने परिसरातील शेतकरी डोक्यावर इरले, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात व्यस्त झाले आहेत. भाताच्या शिवारात ह्यरामा हो रामा.. रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरमिरी झिरमिरी.. माज्या बंधूंच्या शेतावरी, ध्यान मला रामाचं ध्यान मला रामाचं...ह्ण अशा कित्येक पारंपरिक लागण गीतांचे स्वर कानावर पडू लागले आहेत.
सातारा : अल्पशा विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने परिसरातील शेतकरी डोक्यावर इरले, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात व्यस्त झाले आहेत. भाताच्या शिवारात ह्यरामा हो रामा.. रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरमिरी झिरमिरी.. माज्या बंधूंच्या शेतावरी, ध्यान मला रामाचं ध्यान मला रामाचं...ह्ण अशा कित्येक पारंपरिक लागण गीतांचे स्वर कानावर पडू लागले आहेत.
परळी-जावळी खोरे, ठोसेघर, कास, बामणोली हा परिसर निसर्गरम्य आहे. या भागात पावसाचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात, नाचणी, वरी ही पिके घेतात. डिसेंबर-जानेवारी महिन्यात शेतकरी जांभूळ, उंबर अशा झाडांची कवळे बांधतात.
होळीनंतर तरव्यांची भाजणी केली जाते. पावसाला सुरुवात होताच जून महिन्यात याच तरव्यामध्ये भाताच्या लावणीसाठी २१ ते ३० दिवसांपर्यंत रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने औताच्या साह्याने भाताच्या शेतात चिखल करतात. त्यामध्ये भातांच्या रोपांची लावणी करण्यात येते.
डोक्यावर इरलीचा आधार घेऊन पोती, कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भात लावणी करत आहेत. भात लावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये, यासाठी तालावर लागण गीते म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे भल्या पहाटे सुरू होणारा बळीराजाचा दिवस संध्याकाळी सातपर्यंत शेतातच मावळत असल्याचे चित्र दिसत आहे.