सातारा जिल्ह्यात एकूण ४२२.३ मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:19 PM2017-07-19T13:19:01+5:302017-07-19T13:19:01+5:30
२४ तासात एकूण सरासरी ३८.४ मि.मी. पाऊस
सातारा : सातारा जिल्ह्यात बुधवारी पहाटे आणि काल दिवसभरात एकूण ४२२.३ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण सरासरी ३८.४ मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.
सातारा- ३१.५ (३४१.१) मि. मी., जावळी- ५९.८ (६६५.९) मि.मी., पाटण-६९ (५0६.९) मि.मी., कऱ्हाड-३९.८ (१७२.४) मि.मी., कोरेगाव-१0.४ (११२.४) मि.मी., खटाव-७.८ (१७६.२) मि.मी., माण-३ (१८0.२) मि.मी., फलटण-६ (१0९) मि.मी., खंडाळा- ७.१ (१६४.४ ) मि.मी., वाई २५.१ (२७0.३) मि.मी., महाबळेश्वर-१७१ (२१९९.४) याप्रमाणे आजपर्यंत एकूण ४८९८.४ मि.मी. तर सरासरी ४४५.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी तेथे दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.