‘आगाशिव’चा पर्यटन विकास रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:33+5:302021-06-03T04:27:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : अलौकिक निसर्गसौंदर्याने नटलेला आगाशिवचा डोंगर आणि बौद्धकालीन लेण्या म्हणजे कऱ्हाड तालुक्याचा मानबिंदू. २०११ साली ...

Tourism development of 'Agashiv' stalled! | ‘आगाशिव’चा पर्यटन विकास रखडला!

‘आगाशिव’चा पर्यटन विकास रखडला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : अलौकिक निसर्गसौंदर्याने नटलेला आगाशिवचा डोंगर आणि बौद्धकालीन लेण्या म्हणजे कऱ्हाड तालुक्याचा मानबिंदू. २०११ साली आगाशिवला पर्यटन विकासाचे काम सुरू झाले. २०१६पर्यंत काम पूर्ण करण्याचा संकल्पही राज्य शासनाने केला होता. मात्र, प्रत्यक्षात डोंगरावर आत्तापर्यंत फक्त साडेसहा कोटींची प्राथमिक कामे झाली असून, पर्यटनाची स्वप्न पाहणारा हा डोंगर आजही भकास आहे.

कऱ्हाड शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आगाशिव डोंगर आहे. डोंगरात ६५पेक्षा अधिक बौद्धकालीन लेणी आहेत. या लेण्या नेहमीच उपेक्षित राहिल्या असून, प्राचीन शैल्य स्थापत्याच्या अभ्यासकांच्यादृष्टीने त्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आगाशिव डोंगराचा पर्यटन विकास करून लेण्यांचे जतन करण्याची मागणी होत होती. अनेक वर्षे केवळ लोकप्रतिनिधींच्या हातातून इकडे-तिकडे सरकणारी पर्यटन विकासाची ‘फाईल’ अखेर तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढे सरकवत ३२ कोटी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर केला. या निधीचा पहिला हप्ता वर्गही झाला. त्यातून वन विभाग व महसूल विभागाच्या देखरेखीखाली काम सुरू झाले.

पहिल्या टप्प्यात संरक्षक कुंपण, डोंगरावर जाण्यासाठी जखिणवाडी आणि आगाशिवनगर बाजूने पायऱ्या तयार करण्यात आल्या. त्यानंतर वनतळी, शेततळी, लुज बोल्डर बंधारे तयार करण्यात आले तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. हा पहिला टप्पा पाच कोटींचा होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात थोडी रक्कम मिळाली. त्यातूनही ठराविक कामे झाली. मात्र, त्यानंतर या डोंगराकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गत पाच वर्षांपासून आगाशिवचा पर्यटन विकास रखडला आहे.

- चौकट

१) डोंगराचा विस्तार ७५४.९४ हेक्टर.

२) पुरातन शिवमंदिर तसेच ६५हून अधिक लेण्या.

३) स्तंभविरहीत चैत्यगृहे व मंडप असून, सपाट छत आहे.

४) लेण्या ख्रिस्ताब्दाच्या पहिल्या शतकातील असल्याचा अंदाज.

४) लेण्या दोन टप्प्यात खोदल्या असाव्यात.

५) पहिल्या टप्प्यात हीनयान, दुसऱ्या टप्प्यात महायान लेण्या तयार झाल्याची नोंद.

- चौकट

असे पर्यटन... असा होणार होता खर्च!

९ कोटी ६५ लाख : पहिल्या टप्प्यात पर्यटन विकासाची कामे

८ कोटी २३ लाख : दुसऱ्या टप्प्यात २५ किलोमीटर डोंगराभोवती कुंपण

६ कोटी ६० लाख : कार पार्किंग, बालोद्यान, माहिती केंद्र, निवासस्थाने

४ कोटी ५५ लाख : वृक्षारोपण, लेण्यांची दुरूस्ती करणे

२ कोटी ३० लाख : स्वागत कमान, वॉच टॉवर, बालोद्यान, पाणी योजना

- चौकट

प्रस्तावित कामांचा खर्च

लेण्या निगा व विकास : १ कोटी ५७ लाख

पर्यटन केंद्राचे कार्यालय : २१ लाख

वाचनालय, माहिती केंद्र : ६५ लाख

स्वच्छतागृहे : १० लाख

प्रवेशद्वार : ४ लाख

वॉच टॉवर : १२ लाख

पर्यटकांसाठी राहुट्या : २५ लाख

पार्किंग व्यवस्था : ५० लाख

कुंपण : ७ कोटी १८ लाख

जलसिंचन : ७ कोटी ४० लाख

कुंपणाच्या बाजूने झाडे : ५५ लाख

वनतळी : ८० लाख

गॅबियन बंधारे : ५४ लाख

(यासह विविध कामांसाठी एकूण ३१ कोटी ५८ लाख)

- चौकट

प्रकल्पांतर्गत येणारी जमीन

मलकापूर : ३०.८८३

जखिणवाडी : ११०.००

जखिणवाडी : २२६.००

विंग : ९६.००

चचेगाव : ६१.१३

चचेगाव : ३४.४६

धोंडेवाडी : १५.६९

मुनावळे : १५५.३२

काले : १६.५१

(क्षेत्र हेक्टरमध्ये)

फोटो : ०२ केआरडी ०१, ०२

कॅप्शन : आगाशिव डोंगरावरील लेणी.

Web Title: Tourism development of 'Agashiv' stalled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.