पर्यटकांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:26 AM2021-07-16T04:26:53+5:302021-07-16T04:26:53+5:30

महाबळेश्वर : संचारंबदीचे निर्बंध शिथील झाले नसले तरी बहुतांश पर्यटक नियम डावलून महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळांना भेट देत ...

Tourist train | पर्यटकांची रेलचेल

पर्यटकांची रेलचेल

Next

महाबळेश्वर : संचारंबदीचे निर्बंध शिथील झाले नसले तरी बहुतांश पर्यटक नियम डावलून महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळांना भेट देत आहेत. मात्र, अशा पर्यटकांची कोरोना चाचणी केली जात नसल्याने कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिकांंमधून होत आहे.

कचरा रस्त्यावरच

सातारा : सातारा शहरात पालिकेच्यावतीने घंटागाड्या व ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलनाचे काम केले जाते. घंटागाड्यांमार्फत हे काम योग्य पद्धतीने सुरू असले तरी अनेक ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कचरा भरून डेपोकडे मार्गस्थ होत आहेत. हा कचरा रस्त्यावर पडत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पारा १९ अंशांवर

महाबळेश्वर : सातारा शहरासह जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून, महाबळेश्वर व पाचगणीत गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळे तापमान खालावले असून, गुरूवारी शहराचे कमाल तापमान १९.६ तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. थंडीमुळे महाबळेश्वर तालुक्यात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

डागडुजीची मागणी

मेढा : केळघर - महाबळेश्वर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सातारा ते महाबळेश्वर या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. डांबरीकरणाच्या कामामुळे या मार्गावर अवजड वाहतूक सातत्याने सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणचे रस्ते उखडले असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत.

खडीमुळे अपघात

सातारा : अर्कशाळा ते शाहूपुरी चौक या मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून ये-जा करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सातारा नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील खड्डे मुरूम टाकून बुजवले. मात्र, अंतर्गत रस्त्यांची डागडुजी न केल्याने वाहनधारकांची परवड सुरूच आहे.

Web Title: Tourist train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.