पर्यटकांची गाडी आगीत खाक

By admin | Published: May 22, 2015 11:11 PM2015-05-22T23:11:32+5:302015-05-23T00:33:19+5:30

महाबळेश्वर येथील घटना : पर्यटकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

Tourists' car fire | पर्यटकांची गाडी आगीत खाक

पर्यटकांची गाडी आगीत खाक

Next

महाबळेश्वर : वेण्णा लेक रस्त्यावर हिंदू जिमखान्याजवळ पर्यटकांच्या स्कॉर्पिओ गाडीला अचानक लागलेल्या आगीत गाडी जळून खाक झाली. सुदैवाने गाडीतून धूर येत असल्याचे दिसताच गाडीतील सर्व लोकांनी बाहेर उड्या घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेमुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
पाचगणीजवळ असलेल्या शिंदेवाडी येथील विशाल बाजीराव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत महाबळेश्वरला फिरण्यासाठी आले होते. महाबळेश्वर येथे पॉइंट फिरून सायंकाळी वेण्णा लेक येथे थांबण्याचा बेत ठरला होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गाडीत डिझेल भरून ही सर्व मंडळी वेण्णा लेककडे निघाली होती. गाडी हिरडा नाका सोडून हिंदू जिमखान्याच्या गेटजवळ आल्यानंतर गाडीच्या इंजिनमधून व चालकाशेजारील सीटखालून धूर येण्यास सुरुवात झाली. पाहता-पाहता आग वाढू लागल्याने सर्वजण गाडीतून
बाहेर पडले. यानंतर गाडीने पेट घेतला व आगीत गाडी जळून खाक
झाली.
गाडीला आग लागताच तेथे असलेले काही स्थानिकांनी वेण्णा लेक येथून भरून निघालेला एक पाण्याचा टँकर थांबविला व आग विझविण्यास प्रयत्न केला. उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, नगरसेवक नीलेश बावळेकर, राजू शिर्के, संजय पारठे,
पालिका कर्मचारी आबाजी ढोबळे यांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.
दरम्यान, गाडीला आग लागल्याचे समजताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वेण्णा लेक व शहराच्या बाजूला मोठी वाहतुकीची कोंंडी झाली होती. सुमारे दीड तासानांतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. (प्रतिनिधी)

पालिकेचा आपत्कालीन विभाग सुस्त
शुक्रवारी पालिका सभागृहात आपत्कालीन व्यवस्थापनासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोणत्याही क्षणी खबर येऊ शकते अशा वेळी आपण घटनास्थळी तातडीने धावून जाऊन अपघातग्रस्तांची मदत पोहोचविण्यासाठी दक्ष राहिले पाहिजे, अशा सूचना केल्या होत्या; परंतु पालिकेच्या आपत्कालीन विभागात अग्निशामक बंब मागणीसाठी साधारण १५ मिनिटे फोन वाजतच होता.

Web Title: Tourists' car fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.