कासला पठारावर पर्यटकांचा बहर, फुलांचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 06:37 PM2022-08-24T18:37:19+5:302022-08-24T18:38:10+5:30

विस्तृत पठारावरील गर्द हिरवळ, फुललेले रानफुलांचे ताटवे, कोसळणारे छोटेमोठे धबधबे, पावसाच्या सरी अन् दाट धुके काल्पनिक नव्हे तर कास पुष्प पठारावरील वास्तव मनमोहक दृश्य आहे.

Tourists flourish on Kas Plateau, Tourists are enjoying tourism in consecutive holidays | कासला पठारावर पर्यटकांचा बहर, फुलांचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला

कासला पठारावर पर्यटकांचा बहर, फुलांचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला

Next

पेट्री : पर्यटनाच्या आनंदासाठी देश-विदेशातील पावले पश्चिमेकडे वळून यवतेश्वर, कास, भांबवली, बामणोलीला पर्यटकांची गर्दी होत आहे. संततधार पावसामुळे मनमोहक निसर्ग खुणावत आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणावर कास परिसरात दाखल होत आहेत. शनिवार, रविवार सलग सुट्टीत पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहेत.

विस्तृत पठारावरील गर्द हिरवळ, फुललेले रानफुलांचे ताटवे, कोसळणारे छोटेमोठे धबधबे, पावसाच्या सरी अन् दाट धुके काल्पनिक नव्हे तर कास पुष्प पठारावरील वास्तव मनमोहक दृश्य आहे. सौंदर्याने जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान पटकावलेले कास पठार पर्यटकांनी बहरत आहे. जैवविविधतेने नटलेल्या पठारावर फुलांचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटनास येत आहेत. पर्यटकांनी कौटुंबिक सहलीचे क्षण कॅमेऱ्यात टिपून ठेवत आहेत. चारचाकी, दुचाकीच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागत असून पठारावर दीपकांडी, चवर, पंद काही प्रमाणात फुलली असल्याने परिसर मनमोहक बनला आहे.

जलधारा अंगावर झेलत हिरवळीवरून पर्यटक भटकंती करत वाहनांचा ताफा कास तलावाकडे वळत आहे. पर्यटक खरपूस कणसे खाण्यावर भर देत आहेत. पर्यटक सेल्फीस्टिकद्वारे फोटोसेशन करत आहेत. धावत्या गाडीतून निसर्गसौंदर्याचा व्हिडीओ शूट करून तरुणाई रस्त्यावर संगीताचा ठेका धरत नृत्य करतानाचे चित्र आहे.

पोलिसांची करडी नजर!

हजारो पर्यटक कास पठाराला भेट देत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शनिवार, रविवारी यवतेश्वरला पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी होत आहे.

नो रिस्क ओन्ली एन्जॉय!

तरुणाई धावत्या वाहनावर उभे राहणे, धरणाच्या सांडव्याच्या भिंतीवर, मुख्य व्हॉल्व्हवर सेल्फी काढण्यात दंग होऊन पाय घसरून एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ निसर्ग पाहण्याचाच आनंद घेण्याची गरज आहे.

कास तलावावर गर्दी

पर्यटकांची तलावावर गर्दी होऊन सेल्फी, फोटोसेशन करत असल्याने बऱ्याचदा घसरून पडण्याचे प्रकार घडतात. परंतु पर्यटकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

यवतेश्वर धबधबा हाऊसफुल्ल!

यवतेश्वर घाटातील धबधबा पर्यटकांनी हाऊसफुल्ल होत असून, धबधब्याचे पाणी अंगावर झेलत रस्त्याच्या मधोमध सेल्फी काढण्यात मग्न होत आहेत. मर्कटलीळा पाहून पर्यटकांचे मनोरंजन होत आहे. बऱ्याचदा ट्राफिक जाम होत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात कासला भेट देतो. निसर्गसौंदर्याचा अविष्कार नेहमीच मनाला भुरळ घालतो. पठारावर तुरळक फुले फुलण्याच्या मार्गावर आहेत. फुलांचे सौंदर्य जपणे सर्वांचे कर्तव्य आहे. - महादेव जाधव, पर्यटक, सातारा.

Web Title: Tourists flourish on Kas Plateau, Tourists are enjoying tourism in consecutive holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.