बालिकेच्या मृत्यूप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:38 AM2021-04-17T04:38:36+5:302021-04-17T04:38:36+5:30
साताराः तालुक्यातील राकुसलेवाडी येथे आईसमवेत किराणा माल साहित्य घेऊन घरी परतणाऱ्या सात वर्षीय बालिकेस धडक देऊन तिच्या मृत्यूस ...
साताराः तालुक्यातील राकुसलेवाडी येथे आईसमवेत किराणा माल साहित्य घेऊन घरी परतणाऱ्या सात वर्षीय बालिकेस धडक देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
राजेंद्र जिमन असे या ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, जगन्नाथ किसन मोरे (वय ३९, रा. राकुसलेवाडी, पो. आसनगाव, ता. सातारा) हे मजुरी करतात. त्यांची पत्नी दीपाली जगन्नाथ मोरे आणि मुलगी अक्षरा जगन्नाथ मोरे या किराणा माल घरी घेऊन येत होत्या. यावेळी गावातीलच राजेंद्र दिनकर जिमन हा स्वत: भरधाव वेगाने ट्रॅक्टर (एमएच ११ - बीए १४१०) चालवत येत होता. यावेळी ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत अक्षदा ठार झाली तर दीपाली जखमी झाल्या. याप्रकरणी राजेंद्रवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.