भातरोपांच्या लागणीपुर्व चिखलणीला ट्रॅक्टरने सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:32+5:302021-07-18T04:27:32+5:30

कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली परिसर हा बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. ऊस पिकाबरोबर येथे भाताचे क्षेत्र मोठे आहे. ...

The tractor starts the mud before planting the seedlings | भातरोपांच्या लागणीपुर्व चिखलणीला ट्रॅक्टरने सुरुवात

भातरोपांच्या लागणीपुर्व चिखलणीला ट्रॅक्टरने सुरुवात

googlenewsNext

कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली परिसर हा बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. ऊस पिकाबरोबर येथे भाताचे क्षेत्र मोठे आहे. सध्या परिसरात भाताच्या लावणीपूर्व चिखलणीला ट्रॅक्टर यंत्राच्या साह्याने सुरुवात झाली आहे.

भाताचे उत्पादन घेण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. त्या तुलनेत भाताच्या रोपांची लावणी करून उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. भाताच्या रोपांची लावणी करून उत्पादन घेतल्यास ते इतर पध्दतीच्या तुलनेत जादा असते. इंद्रायणी तांदळाला चांगली मागणी असल्याने अनेक शेतकरी या वाणाचे उत्पादन घेतात. सध्या काही शेतकऱ्यांची भाताची रोपे लावणीसाठी आल्याने लावणीपूर्व चिखलणीला ट्रॅक्टर यंत्राच्या साह्याने सुरुवात झाली आहे.

चिखलणीमुळे जमिनीची मशागत होऊन ती भुसभुशीत होते. शिवाय तणाचे प्रमाण कमी झाल्याने भांगलणाचा खर्च कमी होतो. शिवाय उत्पादनात वाढ होते. कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे, नडशी, शिरवडे, सैदापूर, पार्ले, बनवडी आदी गावांत भाताची लागवड करुन उत्पादन घेतले जाते. त्यासाठी शेतकरी लावणीपूर्व चिखलणी करतात.

चौकट

चिखलणी करणे म्हणजे जमिनीतील मातीची रेबडी केली जाते. त्यामुळे भातांच्या रोपांची लावणी चांगली होते. शिवाय जमीन भुसभुशीत होऊन तण मरतात. यासाठी पावसाची गरज असते किंवा शेतात पाणी सोडावे लागते.

फोटो ओळ.. १७ कोपर्डे हवेली

कोपर्डे हवेली परिसरात ट्रॅक्टरच्या साह्याने चिखलणीला सुरुवात झाली आहे. (छाया : शंकर पोळ)

Web Title: The tractor starts the mud before planting the seedlings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.