ग्रामीण भागातील व्यापारी देशोधडीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:41+5:302021-06-03T04:27:41+5:30

फलटण : फलटण तालुक्यात सततच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिक, कामगार, मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलासा देण्याची मागणी विविध ...

Traders in rural areas go abroad! | ग्रामीण भागातील व्यापारी देशोधडीला!

ग्रामीण भागातील व्यापारी देशोधडीला!

Next

फलटण : फलटण तालुक्यात सततच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिक, कामगार, मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलासा देण्याची मागणी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केली आहे.

कोरोना महाभयंकर आजारांमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच या लॉकडाऊनमुळे फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील व्यापारीवर्ग देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहे.

प्रशासनाने सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु यामध्ये ग्रामीण भागातील व्यापारीवर्गाचा कसलाही विचार केला गेला नाही. आज दुकानदारांना गाळे भाडे, कर्जांचे हप्ते, लाईट बिल, व्यापाऱ्यांचे देणे असे अनेक प्रश्न समोर उभे आहेत. गाळेभाडे कर्जाचे हप्ते व इतर देणे शक्य झाले नाही तर भविष्यात लोकांना आपले धंदे बंद करावे लागतील यातून आत्महत्या होण्याचेही प्रकार घडू शकतात.

परंतु प्रशासनाने याचा कसलाही विचार केलेला नाही. तरी त्वरित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा. व तीन महिन्याचे गाळे भाडे, ऑफिस भाडे माफ करून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी द्यावा. या सर्व गोष्टींचा प्रशासनाने गांभीर्याने विचार केला नाही तर भविष्यात व्यापाऱ्यांच्या उद्रेकाला तोंड द्यावे लागेल, याची प्रशासनाने दखल घ्यावी, असे आवाहन व्यावसायिक वसीम इनामदार यांनी केले आहे.

सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात गेले वर्षभर व्यापारीवर्ग बांधकाम व्यावसायिक व त्यांचा कामगार वर्ग यांना प्रचंड आर्थिक संकटातून जावं लागतं आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत या येणारं वर्षात जास्त आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्व व्यावसायिक वर्गाला गाळे भाडे, जागा भाडे बँकांचे कर्जाचे हप्ते त्याचबरोबर थकित लाईट बिल व घरपट्टी यामुळे पूर्ण कणा मोडकळीस आला आहे, तरी राज्य सरकारने या गोष्टीचा विचार करून सर्व बाबींत सवलत दिली पाहिजे जेणे करून पुन्हा उभे राहण्यास मदत होईल, अशी मागणी बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक प्रमोद निंबाळकर यांनी केले आहे.

चाैकट..

मर्यादित वेळ देऊन व्यवसाय सुरू करा..

फलटण तालुका तसेच शहरातील व्यापाऱ्यांचे बँक हप्ते, जीएसटी, संकलित कर, दुकान भाडे, वीज बिल अशा असंख्य प्रश्नांनी सध्या व्यापाऱ्यांची अवस्था फार केविलवाणी झाली आहे, अशातच फलटणमधील रुग्णांची संख्या नक्की किती आहे, हे कोणत्याही मार्गाने समजायला तयार नाही. बाजूच्या गावांमध्ये बारामती, पुणे जिल्हा त्यांना काही मर्यादित वेळ देऊन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रशासनाने विचार करावा व सर्वसामान्य व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी फलटण व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष दिगंबर कुमठेकर यांनी केली आहे.

Web Title: Traders in rural areas go abroad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.