पारंपरिक वाद्यांना हवीय ऊर्जितावस्था !
By admin | Published: August 26, 2016 10:41 PM2016-08-26T22:41:26+5:302016-08-26T23:13:19+5:30
फलटण नागरिकांमधून सूर : डॉल्बी हद्दपार करण्यासाठी जनमानस एकवटले; नियम मोडणाऱ्या मंडळांवर होणार कडक कारवाई
फलटण : मोठ्या आवाजाच्या व हृदयात धडकी भरविणाऱ्या डॉल्बीची चांगलीच धास्ती फलटणकरांनी घेतली असून, सर्वसामान्यांतून डॉल्बी नकोच असा सूर उमटत आहे. गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्याला पसंती देऊन संस्कृती जपण्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
डॉल्बीवर न्यायालयाप्रमाणेच पोलिसांनीही बंदी आणल्याने या भूमिकेचे जनतेतून स्वागत होत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पोलिसांनीही डॉल्बीवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पारंपरिक वाद्ये वाजवून गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होत असताना पाश्चात्य डॉल्बी कशाला, असा सूरही उमटत आहे. उत्सवांमध्ये अंधश्रद्धाचा नायनाट करणारे प्रबोधन अपेक्षित आहे.
डॉल्बी संदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठवून डॉल्बी संदर्भातील परिस्थितीचे सविस्तर विमोचन केले आहे. याला चांगले पाठबळ मिळत आहे. (प्रतिनिधी)