मार्डीत घुमणार पारंपरिक वाद्यांचे सूर

By admin | Published: January 22, 2016 11:47 PM2016-01-22T23:47:07+5:302016-01-23T00:54:15+5:30

डॉल्बी हद्दपार : ग्रामसभेत एकमुखी निर्णय; ‘लोकमत’च्या मोहिमेला प्रतिसाद

The traditional melodrama | मार्डीत घुमणार पारंपरिक वाद्यांचे सूर

मार्डीत घुमणार पारंपरिक वाद्यांचे सूर

Next

पळशी : ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘डॉल्बीमुक्त गाव’ मोहिमेला प्रतिसाद देत माण तालुक्यातील मार्डी गावातूनही डॉल्बी हद्दपार करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी डॉल्बी बंदीचा एकमुखी निर्णय घेतला. त्यामुळे गावात आता पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमणार आहे.मार्डी गावाच्या आजूबाजूला अनेक वाड्या-वस्त्या आहेत. त्यामुळे लग्न कार्यापासून ते विविध कार्यक्रमांच्या मिरवणुका मार्डीतूनच काढल्या जातात. यावेळी होणाऱ्या डॉल्बीचा दणदणाटामुळे आबालवृद्धांच्या काळाजात नेहमीच धकडी भरते. डॉल्बीच्या अनेक दुष्परिणामांना मार्डीकरांना सामोरे जावे लागत होते. डॉल्बी हद्दपार होण्याऐवजी गावात डॉल्बीची चढाओढच पाहायला मिळत होती.‘लोकमत’ने डॉल्बीच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करून ‘डॉल्बीमुक्त गाव’ ही मोहीत सुरू केली होती. संपूर्ण जिल्ह्यातून या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक गावे डॉल्बीमुक्त झाली. आता मार्डी ग्रामपंचायतीनेही ‘लोकमत’च्या या मोहिमेला प्रतिसाद देत गावातून डॉल्बी कायमची हद्दपार केली आहे.
सरपंच कौशल्या पोळ, उपसरपंच राहुल सावंत, ग्रामविकास अधिकारी व्ही. एस. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी दत्ता पोळ, प्रभाकर पोळ, धर्माजी काळे, राजेंद्र पोळ, शिवाजी पोळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

ध्वनिप्रदूषणाला आळा
मार्डी गावातून डॉल्बी पूर्णपणे हद्दपार करण्यात आली आहे. डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर यापुढे सर्व कार्यक्रमांमध्ये करण्यात येईल. डॉल्बीचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. डॉल्बी बंदीमुळे ध्वनिप्रदूषणाला नक्कीच आळा बसेल. याबाबत जनजागृती केली जाईल.
- कौशल्या पोळ,
सरपंच

Web Title: The traditional melodrama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.