अलगुडेवाडीत परप्रांतीय युवकाचा खून, मृतदेह चिलरमध्ये टाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 04:38 PM2019-09-26T16:38:09+5:302019-09-26T16:39:11+5:30
अलगुडेवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत असणाऱ्या कत्तलखान्यातील परप्रांतीय कामगाराचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. सोमेर सोहेबराव अली (वय २७, मूळ रा. फौजदारचर, ता. चाफर जि. दुबरी, आसाम) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
फलटण : अलगुडेवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत असणाऱ्या कत्तलखान्यातील परप्रांतीय कामगाराचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. सोमेर सोहेबराव अली (वय २७, मूळ रा. फौजदारचर, ता. चाफर जि. दुबरी, आसाम) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमेर अली हा कामगार गेल्या काही वर्षांपासून अलगुडेवाडी येथील कत्तलखान्यात कामाला होता. दरम्यान, रात्री सोमेर याच्यावर अज्ञात संशयिताने धारदार शस्त्राने वार करून त्याचा मृतदेह आवारातील चिलरमध्ये टाकला होता.
बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी भेट दिली. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमन करीत आहेत. या खूनप्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.