सातारा लोकसभा निवडणूक मतमोजणीमुळे औद्योगीक वसाहतीतील वाहतुकीत बदल 

By नितीन काळेल | Published: May 31, 2024 10:47 PM2024-05-31T22:47:20+5:302024-05-31T22:47:32+5:30

भोर फाट्याहून गोदामाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनाही प्रवेश मिळणार नाही.

Traffic changes in industrial estate due to counting of Satara Lok Sabha election votes  | सातारा लोकसभा निवडणूक मतमोजणीमुळे औद्योगीक वसाहतीतील वाहतुकीत बदल 

सातारा लोकसभा निवडणूक मतमोजणीमुळे औद्योगीक वसाहतीतील वाहतुकीत बदल 

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी दि. ४ जून रोजी सातारा आैद्योगिक वसाहतीतील डीएमओ गोदामात होणार आहे. यामुळे नागरिकांची गर्दी होणार असल्याने गोदाम परिसरात वाहतूक व्यवस्थेत पोलिसांकडून बदल करण्यात आलेला आहे.

याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आदेश काढला आहे. हा आदेश दि. ३ जून रोजीच्या रात्री ११ वाजून ५५ मिनीटांपासून लागू होणार आहे. खालील मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार वेणूगोपल फुडस (पारले कंपनी) ते कवित्सू कंपनी युनीट क्रमांक दोन कंपनीकडे डीएमओ गोदामासमोरुन येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (शासकीय वाहने वगळून) पूर्णत: प्रवेश बंदी असणार आहे. सुटकेस चाैक येथून वेणूगोपाल फुडस कंपनीकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना बंदी. अजिंक्यतारा सहकारी कृषी केंद्राकडून कृषीटेक कंपनीमार्गे डीएमओ गोदामाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद असणार आहे. तर भोर फाट्याहून गोदामाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनाही प्रवेश मिळणार नाही.

पार्किंग ठिकाणे निश्चित 

- भोर फाटा येथून नवीन आैद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहने रस्त्याच्या बाजुला पार्किग करता येतील.
- जानाई मळाई रस्त्याने निवडणूक मतमोजणी निकालासाठी येणाऱ्या वाहनांना तळ्याजवळील पार्किंगपर्यंत जाता येणार आहे.

Web Title: Traffic changes in industrial estate due to counting of Satara Lok Sabha election votes 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.