पावसामुळे वाईतील रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 03:17 PM2019-07-02T15:17:42+5:302019-07-02T15:19:03+5:30
वाई तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात पावसाचा जोर वाढला असून शेतकऱ्यांतही समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी वाई शहरातील पंचायत समिती रस्त्यावर झाड कोसळले. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागली.
वाई : तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात पावसाचा जोर वाढला असून शेतकऱ्यांतही समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी वाई शहरातील पंचायत समिती रस्त्यावर झाड कोसळले. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागली.
वाई तालुक्यात पावसाने उशिरा सुरूवात केली. तरीही सध्या चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे.
वाई तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने अनेक ठिकाणी झाडे पडू लागली आहेत.
सोमवारी दुपारी चारच्या सुमारास वाई शहरातील पंचायत समिती रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड कोसळले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. महावितरणचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरून झाड हटविण्याचे काम करीत होते.